Weekly
Bhavishya based on Moon Sign for Week 10-Jul-2016 To 16-Jul-2016
आषाढ शुक्ल
पक्षात हा आठवडा येत आहे. पांडुरंग पांडुरंग असा नामघोष आणि पालखीची चर्चा आठवडाभर
राहणार आहे. आठवड्याच्या १५ तारखेला येणारी आषाढी एकादशी महत्वाची ठरेल. आठवडा भर रवीचे
भ्रमण मिथुन राशीमधून असणार आहे. आठवड्याच्या मध्यावर मंगळ वृश्चिकेत पुनःप्रवेश करेल.
बुध ग्रह १२ तारखेला कर्क राशीमध्ये प्रवेश करेल तर १६ तारखेला बुधाचा उदय होईल. गुरु
व राहूचे सिंह राशीमधून भ्रमण करतील. शुक्र कर्क राशीमधून भ्रमणकर्ता आहे तर शनीचे
वृश्चिकेतून वक्री भ्रमण राहील.
मेष: मुलांच्या
कर्तृत्वाने आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थीवर्गाला आठवडा
आनंदी जाईल. नोकरदारांना आठवडा यशदायी जाईल. वरिष्ठांकडून कौतुकाचे क्षण येतील. व्यावसायिकांना
यशात भर आठवडा ठरेल. आर्थिक उलाढाल चांगली राहणार आहे. सरकार दरबारी प्रलंबित कामे
मार्गी लागतील. सामाजिक जीवनात आनंदी वातावरण असेल. शुभ दिवस ११, १४.
वृषभ: मुलांसाठी
विशेष वेळ द्यावा लागेल. कौटुंबिक जीवनात ताण राहील. विशेष करून वैवाहिक जोडीदाराशी
वाद संभवतात. विद्यार्थी वर्गाला यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. नोकरदारांना नव्या संधी
उपलब्ध होतील. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल अपेक्षेच्या जवळपास
राहील. कामानिमीत्त प्रवासाचे योग येतील. सामाजिक जीवनात सहकार्यातून यश मिळेल. शुभ
दिवस १३, १६.
मिथुन: मुलांकडून
सुख मिळवून देणारा आठवडा आहे. कौटुंबिक जीवनातही समाधानाचे वातावरण राहील. प्रसंगी
कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थी वर्गाने नव्या आव्हानांसाठी तयार राहावे.
नोकरदार वर्गाला आठवडा संमिश्र जाईल. कोणताही निर्णय घाईने घेऊ नये. व्यावसायिकांसाठी
आठवडा चांगला जाईल. अपेक्षेप्रमाणे उलाढाल होऊन पुनर्गुंतवणुकीचा विचार कराल. शुभ दिवस
१५, १६.
कर्क: मुलांशी
वादविवाद संभवतात. मात्र प्रसंग सांभाळून घ्यावे. कौटुंबिक जीवनात अस्वस्थता जाणवेल.
विद्यार्थीवर्गाला यशासाठी झगडावे लागेल. नोकरदारांचे वरिष्ठांशी मतभेद होतील. आता
ग्रहस्थिती पूरक नाही. त्यामुळे टोकाची भूमिका घेऊ नये. व्यावसायिकांना आठवडा चांगला
जाईल. मात्र गुंतवणुकीसारखे निर्णय घेताना सावध राहावे. सामाजिक जीवनात इतरांचे सहकार्य
घ्यावे लागेल. शुभ दिवस १०, १२.
सिंह: मुलांसाठी
वेळ काढावा लागेल. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. विद्यार्थी वर्गाला आठवडा
चांगला जाईल. नोकरदारांना आठवडा ताणतणावाचा जाईल. मात्र पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून
फायदा मिळेल. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल चांगली राहील. ह्या
आठवड्यात प्रवास शक्यतो टाळावेत. शुभ दिवस १३, १४.
कन्या: मुलांच्या
भविष्याबद्दल महत्वाचे निर्णय घ्याल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. प्रसंगी पैसेही
खर्च करावे लागतील. विद्यार्थीवर्गाला आठवडा आनंददायी जाईल. नोकरदारांना नव्या संधी
उपलब्ध होतील. व्यावसायिकांना आठवडा फलदायी जाईल. मात्र व्यवहार करताना सहजासहजी कोणावर
विश्वास ठेवू नये.
सरकार दरबारी
प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा. शुभ दिवस ११, १५.
तूळ: मुलांच्या
अडचणी समजून घ्यावा लागतील. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. किचकट प्रश्न
पुढे ढकलावेत. विद्यार्थी वर्गाने एकाग्रता साधण्यावर भर द्यावा. नोकरदारांनी सयंमाची
भूमिका ठेवावी. व्यावसायिकांना चांगल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. आर्थिक उलाढाल
कमी राहील. अनुभवी लोकांच्या सल्ल्याने पुढे जावे. सामाजिक जीवनात आनंदाचे वातावरण
राहील. शुभ दिवस १३, १४.
वृश्चिक:
मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. कौटुंबिक जीवनात समाधानी वातावरण असेल. घरात धार्मिक
कार्ये संभवतात. विद्यार्थी वर्गाला आठवडा संमिश्र जाईल. नोकरदारवर्गाचे वरिष्ठांशी
मतभेद होतील. अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागेल. व्यावसायिकांना आठवडा संमिश्र जाईल.
आर्थिक उलाढाल अपेक्षेपेक्षा कमी राहील. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत. शुभ दिवस
१२, १६.
धनु: मुलांसंबंधातील
प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंदादी वातावरण असेल. नात्यातल्या
एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला यशदायी आठवडा ठरेल. नोकरदार
व्यक्तींना अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. आर्थिक नियोजन कोलमडू शकते. व्यावसायिकांना
आठवडा चांगला जाईल. व्यवसायात आवक चांगली राहील. शुभ दिवस १०, १३.
मकर: मुलांच्या
आनंदात सहभागी व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. विद्यार्थी वर्गाने यश मिळवण्यासाठी
चुकीच्या मार्गांचा मोह टाळावा. नोकरदार व्यक्तींनी देखील यशासाठी प्रयत्न करताना आपण
काही चुका तर करत नाहीये ना याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल.
आर्थिक उलाढाल संमिश्र जाईल. सरकार दरबारी वजन खर्ची होईल. शुभ दिवस १४, १५.
कुंभ: मुलांशी
मतभेद संभवतात. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. विद्यार्थी वर्गाला आठवडा
यशदायी जाईल. नोकरदार वर्गाने सहज कोणावर विश्वास ठेवू नये. तसेच स्वबळावर यश मिळवण्याचा
प्रयत्न करावा. व्यावसायिकांना आठवडा कष्टदायी जाईल. कामाचा तणाव जाणेल. आवकपेक्षा
जावकचेच प्रमाण अधिक राहील. सरकार दरबाराचे काम पुढे ढकलावे. शुभ दिवस १०, १२.
मीन: मुलांच्या
भविष्याचे निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाला
यशदायी आठवडा जाईल. नोकरदार वर्गाला संमिश्र वातावरण राहणार आहे. यशासाठी वाट पाहावी
लागेल. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल चांगली राहील. गुंतवणुकीच्या
नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक जीवनात मत विचारपूर्वक व्यक्त करावेत.शुभ दिवस १०,
११.
- होरापंडीत
मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र
। वास्तुशास्त्र । रमलशास्त्र ।
होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला
केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
No comments:
Post a Comment