Tuesday, 5 July 2016

प्रारब्ध अंक आणि करिअर

प्रारब्ध अंक आणि करिअर

खरं तर अंकशास्त्रामध्ये प्रारब्ध अंकाचा वापर अगदी मोजूनच होतो ... कारण प्रारब्ध अंक हा जस एखाद मोठं यश देऊ शकतो तसंच आणि तितकच एखादं मोठं अपयश देखील ...

पण हाच प्रारब्ध अंक आपल्याला आपल्या करिअरचे क्षेत्र निवडण्यास मदत करतो ...

पुढे प्रारब्ध अंकानुसार उदाहरणादाखल काही क्षेत्रे दिली आहेत ...

प्रारब्ध अंक १: अभिनेते, छायाचित्रकार, पत्रकार, न्यायसंस्था प्रशासक, वितरक इत्यादी (अमिताभ बच्चन यांचा प्रारब्ध अंक १ आहे)

प्रारब्ध अंक २: उत्तम खानसामा, वैद्यकीय व्यवसाय त्यातही शल्यचिकित्सक, प्रवासी संस्था, पाणी पुरवठा अभियंता, नौदल इत्यादी

प्रारब्ध अंक ३: उपहारगृह व्यावसायिक, दूरदर्शन वा रंगमंचाशी संबंधित निर्माते, कर सल्लागार, कायदेपंडित निरीक्षक, शेअर दलाल इत्यादी

प्रारब्ध अंक ४: हिशोब, अर्थखाते, बांधकाम अभियंता, विदयुत क्षेत्र, संगणक क्षेत्र, औषध विक्रेते इत्यादी

प्रारब्ध अंक ५: मुत्सद्दी, राजदूत, विक्री क्षेत्र, राजकारण, वाहनचालक, गणितीतज्ञ, ज्योतिषी इत्यादी (माझा प्रारब्ध अंक पाचच आहे)

प्रारब्ध अंक ६: कायदेपंडित, शिक्षक, नाट्य व चित्रपट क्षेत्र, सुवर्णाकार, दुग्धालय, आयकर इत्यादी

प्रारब्ध अंक ७: केशभूषाकार, निसोर्गोपचार, सचिव सहाय्यक, तत्वज्ञ, गुप्त गोष्टींशी संबंधित क्षेत्र, धार्मिक क्षेत्रांशी संबंधित पर्यटन व्यवसाय इत्यादी

प्रारब्ध अंक ८: मोठे व्यवसाय, शेअर दलाली, लोखंड तसेच पोलाद क्षेत्र, शासकीय सेवा क्षेत्र, काच काम, सुतार काम इत्यादी

प्रारब्ध अंक ९: पोलीस खाते, लष्कर खाते, अग्निशामक दल, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, इस्टेट एजंट इत्यादी (डॉ. नितु मांडके यांचा प्रारब्ध अंक ९ आहे.)

इथे फक्त उदाहरणा दाखल काही व्यवसाय दिले आहेत. प्रत्येक प्रारब्ध अंकाच्या प्रभावाखाली अनेक क्षेत्रे आहेत.

हे क्षेत्र ठरवताना भाग्यांकाचा तसेच इतर ग्रहांच्या बलांचा विचार देखील केला जातो.

आपणही आपल्या प्रारब्ध अंकानुसार आपल्याला उपयुक्त करिअरचे क्षेत्र जाणून घेऊ शकता.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

 टीप: प्रारब्ध अंक हा आपल्या जन्म तारखेतील सर्व अंकांची एकेरी बेरीज असते. उदाहरणार्थ जर एखाद्याची जन्म तारीख ०५ जुलै १९७८ असेल तर त्याचा प्रारब्ध अंक पुढील प्रमाणे येईल:

५ + ७ + १ + ९ + ७ + ८ = ३७, ३ + ७ = १०, १ + ० = १

या व्यक्तीचा प्रारब्ध अंक १ येईल.

No comments:

Post a Comment