मंगळदोष
सुरवातीलाच स्पष्ट करावेसे वाटते कि मंगळदोषाचा जेवढा बाऊ आपल्याकडे केला जातो, तेवढा तो प्रत्येकवेळी असतोच असे नाही.
किंबहुना मंगळदोषावरच काही गुरुजी थांबतात आणि मग एखादा अतिशुभ किंवा अतिअशुभ योग दुर्लक्षिला जातो.

याचा परिणाम असा होतो कि मंगळदोष असला तरी त्यावर मात करेल असा एशकते खादा
अतिशुभ योग कुंडलीत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष झाले तर असे एखादे चांगले
स्थळ नाकारले जाऊ शकते.
तसेच मंगळदोषाबरोबरच एखादा वैवाहिक सौख्याला मारक असा आणखी एखादा अतिअशुभ योग असला, ज्योतिषाने जातकाला फक्त मंगळदोष सांगितला आणि त्याचवेळी जातक मंगळदोष न मानता पुढे गेला तर त्याच्या वैवाहिक सुखात बाधा येऊ शकते.
आता मंगळदोषा बद्दल:
आकाशस्थ मंगळ ग्रह मुळातच लाल दिसतो आणि म्हणून याला नेहमी तापट समजले जाते. सतत भांडण करणे किंवा लावणे, टोकाची भूमिका घेणे, आदळआपट हे सगळे गुण जोडीने आलेच. असा मंगळ जेव्हा विवाहाशी संबंधित स्थानांमध्ये येतो (लग्न स्थान ज्याला व्यक्तिमत्व स्थान म्हणले जाते, चतुर्थ स्थान ज्याला सुख स्थान विशेषतः वास्तू वाहन सुखाचे स्थान म्हणले जाते, सप्तम स्थान ज्यावरून वैवाहिक सौख्याचा विचार होतो व अष्टम स्थान जे सप्तामाचे धन स्थान किंवा कुटुंब स्थान आहे) तेव्हा तो या स्थानांच्या शुभ फलीतांमध्ये कमतरता आणतो तर अशुभ फलीतांमध्ये वाढ करतो. दक्षिणात्य भागात द्वितीयातला मंगळही मंगळदोष मानला जातो.
मात्र हा फक्त स्थानाचा विचार झाला. ज्योतिषशास्त्र याही पुढे जाउन अति सूक्ष्म विचार करते. जसे कि तो कोणत्या राशीमध्ये आहे, कोणत्या नक्षत्रात कोणत्या नवमांशात आहे. तो कोणत्या ग्रहाच्या युतीत अथवा दृष्टीत आहे. तो शुभ किंवा पाप कर्तरीत आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेणे महत्वाचे ठरते.
त्याही पुढे जाउन मंगळदोष आहे, म्हणून अडथळेच येतील असे न मानता जी बाजू मंगळाने कमकुवत केली आहे ती बाजू इतर कोणता ग्रह/ग्रहयोग उचलून धरतो का हे ही तपासणे महत्वाचे ठरते.
हाच भाग गुणमेलनाच्या वेळी सुद्धा येतो. एखाद्या मुलाच्या/मुलीच्या कुंडली मंगळदोष असता ती सरसकट न नाकारता त्याचा प्रभाव तपासणे महत्वाचे ठरते.
शेवटी एकच सांगीन, कि मंगळदोष महत्वाचा असला तरी त्याचा स्वतंत्र विचार न करता इतर ग्रहदोषांप्रमाणेच त्याचा विचार व्हावा. व त्याच्यावर मात करणाराही एखादा ग्रहयोग आहे का हे हि तपासावे.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

No comments:
Post a Comment