चांडाळ योगाचा फेरा सुटला ...
१४ जुलै २०१५ ला गुरुने सिंह राशीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी ०९ जानेवारी २०१६ ला राहुने सिंह राशीमध्ये प्रवेश केला.
तेव्हा आदल्या दिवशीच गुरु सिंह राशीमध्ये २९ अंशावर वक्री झालेला. त्यामुळे राहु गुरुची थेट भेट होऊन चांडाळ योगाची सुरवात झाली. गुरुची गतिमानता राहुपेक्षा अधिक असल्याने तो वेगाने राहुच्या पुढे जात होता.
०९ मे ला गुरु मार्गी झाला. एकीकडे राहु त्याच्या वक्री गतीने पुढे सरकत होता तर गुरु मार्गी होऊन राहुकडे सरकत होता. वटपौर्णिमेला पुन्हा एकदा गुरु राहुची अंशात्मक युती झाली.
त्यानंतर मात्र गुरु व राहु एकमेकांशी पाठ करुन वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करु लागले. आणि ११ ऑगस्टला गुरुने कन्या राशीत प्रवेश केला.
गुरु हा नवनिर्मितीचा कारक असल्याने सर्वांनाच थोड्याफार फरकाने या योगाचा त्रास झाला. विशेषतः नव्या संधींचा शोध घेणाऱ्यांच्या हाती या काळात निराशा आली. बाहेर म्हणाव्या तशा संधी उपलब्ध होत नव्हत्या, आणि ज्यांना संधी मिळाल्या त्यांना त्यातुन समाधान मिळाले नाही.
वैवाहिक सौख्याच्या बाबतीतही अनेकांनी अनेक स्थित्यंतरे पहिली. काहींचे वाद तुटेपर्यंत ताणले गेले, काहींचे तुटता तुटता वाचले. विवाहयोगाला हा चांडाळ योग जरा अधिकच मारक ठरला.
तिसरा आणि अधिक महत्वाचा भाग म्हणजे संतती सुखाच्या दृष्टीने अनेक दाम्पत्यांची परीक्षाच या योगाने पाहिली.
आता मात्र गुरुने कन्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि गेले तब्बल सात महिने या चांडाळ योगाने निर्माण केलेली संभ्रमावस्था संपली. हा गुरु बदल काहींना मारक तर काहींना तारक ठरेल. पण एक नक्की चांडाळ योगातुन नवनिर्मितीमध्ये आलेले अडथळे आता दुर होऊ लागले आहेत.
भारताच्या महिला खेळाडूंनी ऑलम्पिकमध्ये मिळवलेले विजय हे सुद्धा भारतीय क्रीडा विश्वात एका नव्या युगाची सुरवात करणारेच आहेत.
आपल्या कुंडलीतील नव्या संधींचा शोध घेण्यासाठी एकदा संपर्क नक्की करा ...
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment