
ह्या जातकाचे वडील साधारण दोन आठवड्यांपूर्वी माझ्या नव्या ज्योतिष कार्यालयामध्ये आले होते. मुलाला मनासारखी नोकरी नाही. नोकरी नाही तर छोकरीपण नाही असाच त्यांचा सूर होता. एकीकडे मुलाचे वय मात्र वाढत चाललेले. त्यामुळे जाणारा प्रत्येक'दिवस काळजीमध्ये अधिक भर घालणारा होत होता. नक्की पुढे कसे जावे याचाच प्रश्न त्यांच्या मनात घोळत होत होता.
आपण मुलाची रीतसर कुंडली अभ्यासली. लग्नी मीन हि द्विस्वभावाची राशी तर चंद्र रास हि तीच. लग्नेश गुरु लग्नी असला तरी तो राहु बरोबर होता. इथे तो थेट राहुच्या युतीमध्ये नसला तरी राहुचा परिणाम थोडा तरी होणारच. पंचमेश चंद्र लग्नी राजयोगी असला तरी तो अंशात्मक दृष्ट्या राहुच्या युतीमध्ये असल्याने ग्रहणयोग होत आहे. एकीकडे द्विस्वभाव राशी दुसरीकडे चांडाळ योग ग्रहण योग यांचे सावट. जातक प्रचंड तणावाखाली वावरत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
सप्तमात बुधाची कन्या रास तर सप्तमेश बुध लाभ स्थानामध्ये मित्र राशीमध्ये. सप्तमात केतु तर सप्तमावर गुरु, चंद्र,राहु व शनिची थेट दृष्टी. सप्तमाशी शनिचा थेट संबंध आला कि विवाहयोग तिशीच्या पुढे जातो. स्वतः राहु=केतुचे वय ३२ वर्षे असुन तोवर लग्न होत नाही. या अर्थाने २०२० च्या पहिल्या तिमाही पर्यंत जातकाचे लग्न होत नाही.
सध्या त्याच्या कुंडलीमध्ये सप्तमेशाचीच महादशा (बुध महादशा) चालु आहे. तर बुधामध्ये गुरुची अंतर्दशा चालु आहे. एप्रिल २०१९ नंतर शनि अंतर्दशा सुरु होईल. तेव्हा शनिचे मकरेतुन म्हणजेच जन्म कुंडलीच्या लाभातुन भ्रमण होईल. तर मार्च २०१९ नंतर गुरुचेही मकरेतुन म्हणजेच जन्म कुंडलीच्या लाभातुन भ्रमण होईल. आणि अगदी याच काळात जातकाचा विवाह होईल.
मात्र यासाठी जातकाने स्वतःच्या पायावर स्थिर होणे गरजेचे आहे. तरच त्याला मनाजोगे स्थळ मिळु शकेल. सद्य ग्रहस्थिती, जातकाचे प्रश्न व पुढील ध्येय यांचा एकत्रित विचार करुन जातकास बुधाचे जेड हे रत्न धारण करण्यास सांगितले. सद्य महादशा बुधाचीच असुन तो सुख स्थानाचाही कारक आहे. त्यामुळे हे रत्न अडचणींमधुन मार्ग काढुन जातकाला योग्य दिशेने पुढे जाण्यात मदत करेल. विवाह योगाच्या काळात अवाजवी अपेक्षा न धरता आपल्याला साजेशी अश्या जोडीदाराची निवड करायला हे रत्न मदत करेल.
या पद्धतीने आपणही आपला विवाहयोग तपासुन रत्न धारण करु शकता.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/PerfectlyMatchingGemstone/
No comments:
Post a Comment