Friday, 9 February 2018

आपल्या दक्षिणोत्तर दिशांसाठी चित्र साधना ...




आपल्या आयुष्यात सर्वच काही आलबेल चालु असते असे नाही. अशावेळी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना चढ उत्तरांना सामोरे जात असताना आपली वास्तूही आपल्या पाठीशी उभी असते. कारण मी नेहमी सांगतो कि आपल्या दिवसाची सुरवात आपल्या वास्तूमधुन होते तर दिवसाचा शेवटही आपल्या वास्तूमध्येच होतो.

मग या वास्तूमधील दिशांचा प्रेरणा म्हणुन आपण सहज वापर करु शकतो.

आपल्या प्रगतीमध्ये दक्षिण दिशेचा वाटा महत्वाचा असतो कारण हि स्थिर दिशा आहे. इथे येऊन आपण स्थिरावतो, विसावा घेतो आणि परत मार्गक्रमणाला लागतो. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात, क्रेडिट कार्ड किंवा इझी लोनच्या जगात आपण काहीना काही कारणाने कर्ज घेत असतो. काही कर्ज सहज सुटतात, तर काही कर्ज एकेक दिवस मोजत सुटतात. अशावेळी आपल्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला मोराचे पीस लावले असता हि कर्ज मार्गी लागायला काही प्रमाणात मदत होते. आता हे मोराचे पीस सहजासहजी उपलब्ध होईलच असे नाही. उपलब्ध झाले तरी ते चांगले टीकेलाच असे नाही. दुसरे असे कि नुसते मोराचे पीस लावले तर दहा जण प्रश्न विचारातील. यापेक्षा सोबत दिलेल्या मोराच्या जोडीचे चित्र लावले असता आपले ईप्सितही साध्य होते कोणाला काही कळूनही येत नाही. आपली दक्षिण दिशा सुशोभित होते ते वेगळेच.

आपल्याकडे उत्तर दिशेचे स्वामित्व कुबेर देवतेकडे दिले आहे. हि देवता उत्तरेकडुन आपल्या वास्तूकडे पाहात असते. घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी म्हणुन आशिर्वाद देत असते. अशावेळी आपली उत्तर दिशा मोकळी स्वच्छ प्रसन्न प्रकाशित असेल तर याचा अधिकाधिक प्रभाव मिळतो. मात्र हे प्रत्येक वेळी होईलच असे नाही. अशावेळी आपली उत्तर दिशा बंदिस्त असल्यास अथवा वर म्हणल्याप्रमाणे मोकळी प्रसन्न प्रकाशित नसल्यास उत्तरेकडील भिंतीवर सोबत दिलेले सात घोड्यांचे चित्र लावावे. हे घोडे धावते असुन गतिमानतेचे प्रगतीचे द्योतक आहेत. इथे चंद्राचा प्रकाश असल्याने प्रसन्नता आहे. उत्तर ईशान्य भागात पाण्याचे अस्तित्व आले आहे. त्यामुळे आपोआपच हि दिशाही शुभ झाली आहे. समोर विस्तीर्ण जागा असुन गाव टुमदार घर आहेत. त्यामुळे चित्र रूपात आपली उत्तर दिशा मोकळी होते. तिथुन अपेक्षित ऊर्जा मिळायला मदत होते.


या दोन्ही फोटो फ्रेम चित्र रुपाने आपल्या दक्षिणोत्तर दिशांना शुभ फलदायी करतात. या फोटो फ्रेम आपण घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये लावु शकता. या फोटोफ्रेम आमच्या ज्योतिष कार्यालयामध्ये विक्रीस उपलब्ध केलेल्या आहेत.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/

No comments:

Post a Comment