
त्यांनी
फोनवरुन मार्गदर्शनाची वेळ घेतली. त्या निमित्ताने त्यांच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करण्याचा योग आला. सध्या परदेशी जाणे हा एक योग
राहिलेला नसुन श्रीमंतांपासुन ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच ते
हळुहळु सहज शक्य होऊ लागले आहे. मग अशावेळी परदेश
योगसाठी कुंडली तपासायची खरंच गरज आहे का? हा प्रश्न सहज
मनामध्ये येऊ शकतो. परदेशगमन जेव्हा कोणत्याही उद्देशाविना निव्वळ मनोरंजनासाठी म्हणुन केले जाते तेव्हा कुंडली तपासण्याची गरज नाही. मात्र हे परदेशगमन जेव्हा
काही उद्दिष्ट ठेवुन केले जाते तेव्हा मात्र प्रवासाचा निर्णय घेण्याआधी एकदा कुंडली दाखवणे उपयुक्त ठरते. जसे कि काहीजण शिक्षणासाठी
परदेशी जातात, तर काही नोकरीसाठी,
कोणी व्यवसायासाठी जाते तर कोणी औषोधोपचार
करुन घेण्यासाठी जाते.
ध्येय
वेगवेगळी असली तरी यात यश मिळेल कि
नाही, उद्दिष्ट सफल होईल कि नाही, केलेल्यागुंतवणुकींमध्ये
फायदा होईल कि नाही, आत्ताच
जावे कि जाणे पुढे
ढकलावे, हि संधी स्वीकारावी
कि नाही या व यासारख्या
अनेक प्रश्नांची उत्तरे कुंडलीमध्ये शोधणे महत्वाचे ठरते. आणि या नंतरच खरतर
परदेशगमनासारखा निर्णय घ्यावा. आयुष्यात एखादे ध्येय ठेवणे आणि त्या ध्येय मार्गावर वाटचाल करणे या साठी मनाची
ताकद मोठी लागते. व्यक्तिमत्वाचा विकास तसा व्हावा लागतो. त्यामुळे यशस्वी परदेशगमनाचा विचार करताना सर्वप्रथम कुंडलीमधील लग्न व लग्नेश तपासावे
लागतात. चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे, तिथे त्याची स्थिती कशी आहे, राशी स्वामीची स्थिती कशी आहे हे तपासावे लागते.
लग्नाला व चंद्राला व
चंद्र राशीला पाहणारे ग्रह तपासावे लागतात.
कुंडलीमध्ये
तृतीय स्थानाकडे प्रवासाची मुख्य जबाबदारी दिलीये, तर तृतीयाचे तृतीय
म्हणुन पंचम स्थानाला महत्व आहे. आधीही म्हणल्याप्रमाणे नुसता प्रवास योग येऊन उपयोग नाही तर त्यातुन काहीतरी
साध्य हाताशी आले पाहिजे म्हणुन भाग्यस्थान तपासणे महत्वाचे ठरते. या नंतर संबंध
येतो तो लाभ स्थानाचा.
कुंडलीतील इच्छापूर्ती स्थान म्हणुन जसे या स्थानाचे महत्व
आहे, तसेच ते तृतीयाचे भाग्यस्थान
म्हणुनही इथे त्याचे महत्व आहे. प्रवास हा जसा नगर
अंतर्गत, देशांतर्गत असतो तसाच तो देशा बाहेरही
असतो. आणि म्हणुनच परदेशगमनाचा विचार करताना व्यय स्थानाचा विचार महत्वाचा ठरतो. हि स्थाने, या
स्थानांतील ग्रह, या स्थानांचे स्वामी
व या स्थानांना पाहणारे
ग्रह यांचा सर्वांगीण अभ्यास करुन या योगाचे फलित
ठरविले जाते.
वर
उल्लेखिलेल्या जातकाची जन्म कुंडली सोबत उदाहरण\म्हणुन दिली आहे. लग्नी मिथुन रास आहे. लग्नेश बुध भाग्यामध्ये मित्र राशीचा राजयोगी आहे. लग्नेश व चतुर्थेश दोघे
भाग्यामध्ये गेल्याने एक प्रकारे दोन
राजयोग झालेले आहेत. दशमेश गुरु लग्नी आल्याने कर्म स्थान बळकट झाले आहे. लाभेश मंगळ लग्नी शत्रु राशीचा असला तरी लाभेश लग्नी आल्याने संमिश्र फलदायी झाला आहे. तृतीय स्थानी सिंह रास असुन तृतीयेश रवि भाग्यामध्ये शत्रु राशीमध्ये आला आहे. इथे तृतीयेश व भाग्येश यांचा
परिवर्तन योग असल्याने दोन्ही ग्रह राजयोगी आहेत. पंचमात तुळ रास आली असुन पंचमेश भाग्यामध्ये आहे. भाग्य स्थानी शनिची कुंभ रास आली असुन राशी स्वामी तृतीयामध्ये आहे. भाग्यामध्ये लग्नेश बुध, तृतीयेश रवि, व्ययेश शुक्र अशी ग्रहांची मांदियाळी आहे. आणि इथेच परदेश वास्तव्य व त्यात आलेल्या
यशाचे गमक आहे. कारण लग्नेश इथे राजयोगी झालेला आहे, तर प्रवासाशी संबंधित
रवि इथे राजयोगात आहे व सर्वात महत्वाचे
परदेश योगाशी संबंधित व्यय स्थानाचा स्वामी देखील भाग्य स्थानामध्येच आला आहे. यामुळे या जातकाला नुसताच
परदेशी जाण्याचा योग आलाय नाही तर त्याचे परदेशात
मोठ्याप्रमाणावर वास्तव्य देखील झाले.
परदेश
योगाविषयी बोलायचे तर हा लेख
खूपच छोटा आहे, मात्र या विषयाची ओळख
करुन देण्याचा यात प्रयत्न केला आहे. आपणही आपल्या परदेशगमनाविषयी अथवा परदेश वास्तव्यामधील अडचणींविषयी सविस्तर मार्गदर्शन घेऊ शकता.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/
No comments:
Post a Comment