Friday, 12 January 2018

विवाह योग



मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होते, ते अर्थार्जनाला लागतात आणि आई वडिलांची लग्नासाठी घाई सुरु होते. काहींचे लग्न एका झटक्यात ठरुनही जाते तर काहींचे लग्न ठरता ठरत नाही. सुरवातीचा काही काळ विवाह योगच नसेल म्हणुन काढला जातो, पण जस जसा उशीर होत जातो तस तशी आई वडिलांची काळजी वाढु लागते. मग ज्योतिषांकडचे हेलपाटे वाढतात. विविध उपाय, यज्ञ याग, मंत्र तंत्र सुरु होतात. पण नक्की विवाहयोग कधी आहे याचा कोणीच विचार करत नाही.

खरे तर विवाह योग हा विवाहासाठी स्थळे बघायला सुरवात करण्या आधीच तज्ञ ज्योतिषाकडून तपासला पाहिजे. काही वेळेस विवाह योग खुप लांब असतो आणि आपण खुप आधीच स्थळं बघायला सुरवात करतो. याचा परिणाम मुलामुलींच्या करिअरवर सुद्धा होऊ शकतो. काहीवेळेस स्थळ नापसंत झाल्याने मुलामुलींमध्ये नैराश्य येते. तर कधी कधी विवाह संस्थेविषयीच अनास्था निर्माण होते.

या उलट विवाह योगाचा कालावधी लक्षात आला (इथे विवाहाची तारीख वगैरे अजिबात अपेक्षित नाही), वधु अथवा वराची दिशा लक्षात आली, तो कसा असेल हे लक्षात तर योग्य वेळी योग्य प्रयत्न होतात. आणि मनासारखे स्थळ मिळुन दोन्हीकडची मंडळी आनंदी होतात. मुलीच्या लग्नात बापाची चप्पल झिजते असे म्हणतात. खरे हि असेल ते. पण किती चप्पला झिजाव्यात याचाही विचार व्हायलाच हवा.

लग्न योग्य वयात होण्याच्या अट्टाहासापेक्षा योग्य वेळी होणे अधिक योग्य नाही का? अनेक श्रद्ध आणि अंधश्रद्ध उपायांच्या मागे लागण्यापेक्षा याच काळात मुलामुलींना मानसिक दृष्ट्या तयार करणे अधिक गरजेचे नाही का? अपेक्षा असायलाच पाहिजेत पण त्या इतक्याही नसाव्यात कि हाती फक्त उपेक्षाच येईल.

म्हणुनच मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहासाठी स्थळे बघायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा विवाहयोग, मुलगा कसा असेल, कुठल्या दिशेचा असेल या यासारख्या अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन जरुर घ्यावे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/

No comments:

Post a Comment