एखाद्या
जातकाची कुंडली अभ्यासत असताना सर्व प्रथम लग्न कुंडली महत्वाची असते खालोखाल महत्व येते ते चंद्र कुंडलीचे.
आणि त्या नंतर महत्वाची ठरते ती नवमांश कुंडली.
या तीनही कुंडल्यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय फलित सांगणे चुकीचे ठरेल.
आपण
आधी जाणुन घेऊ यात कि नवमांश म्हणजे
काय? आपल्या पृथ्वीला केंद्र स्थानी धरुन आपण इतर ग्रहांचा, चंद्र या उपग्रहाचा व
रवि या ताऱ्याचा विचार
करतो. वर्तुळाचे ३६० अंश असतात. या अशांना आपण
१२ राशींमध्ये समसमान वाटले आहे. प्रत्येक राशीच्या वाट्याला ३० अंश येतात.
या तीस अशांना पुन्हा एकदा नऊ अंशांमध्ये विभागले
जाते. याला नवमांश असे म्हणले जाते. प्रत्येक नवमांशाच्या वाटेला ३ अंश २०
कला येतात. एका नक्षत्रामध्ये चार नवमांश असतात. या नवमांशाना १२
राशींचाच संबंध जोडला आहे. मेष राशीतील पहिला नवमांश मेषेचा असे सुरवात करुन मीन राशीतील शेवटचा नवमांश मीनेचा असा हा प्रवास आहे.
हि
नवमांश कुंडली बनविण्यासाठी जातकाची जन्म तारीख, जन्म वेळ व जन्म ठिकाण
निश्चित असावे लागते. या माहितीवरुन लग्न
कुंडली बनविली जाते. या मध्ये लग्न
स्थान व सर्व ग्रहांचे
स्पष्ट अंश कला काढल्या जातात. त्या नंतर लग्न स्थान ज्या नवमांशात असेल तो नवमांश, नवमांश
कुंडलीतील लग्न स्थान होतो. आणि मग इतर राशी
मांडल्या जातात. या नंतर जो
ग्रह ज्या नवमांशामध्ये असेल त्या स्थानात मांडला जातो. आणि तयार होते नवमांश कुंडली. जो ग्रह लग्न
कुंडलीमध्ये व नवमांश कुंडलीमध्ये
एकाच राशीमध्ये असतो त्याला वर्गोत्तम म्हणले जाते. तर ग्रह उच्च
नवमांशी, स्व नवमांशी, अथवा मित्र नवमांशी असता त्याला बल प्राप्त होते.
आता
या नवमांशाचे महत्व सांगणारे एक उदाहरण सोबत
जोडले आहे. लग्न कुंडलीमध्ये पंचमेश मंगळ चतुर्थामध्ये गेल्याने राजयोगी झाला आहे. मात्र तो शत्रु राशीमध्ये
असल्याने वर वर पाहता
अशुभ फलदायी अथवा निर्बली वाटतो. मात्र हाच मंगळ कुठल्या नवमांशामध्ये आहे हे तपासले असता
तो मकर नवमांशी म्हणजेच उच्च नवमांशी असल्याचे लक्षात येते. एकीकडे लग्न कुंडलीतील स्थानामुळे राजयोगी व त्यात उच्च
नवमांशी यामुळे ह्याच मंगळाला बल प्राप्त होते.
हाच
भाग शनि व गुरु विषयी
सांगता येईल. सप्तमेश गुरु पंचमात राजयोगी मात्र शत्रु राशीमध्ये तर भाग्येश गुरु
सप्तमात राजयोगी मात्र नीच राशीमध्ये. वर करणी पाहता
हे ग्रह अशुभ फलदायी अथवा निर्बली वाटतात. पण त्यांच्या नवमांशाचा
विचार करता ते आपल्या उच्च
नवमांशी असल्याचे लक्षात येते. आणि इथेच त्यांना नवमांशातुन बल प्राप्त होते.
या
नवमांश कुंडलीचा अभ्यास करता आणखी एक राजयोग समोर
येतो. इथे चंद्र गुरुच्या नवमांशी तर गुरु चंद्राच्या
नवमांशी आहे. या दोन ग्रहांमध्ये
नवमांशातुन अन्योन्य योग झाला असुन हा राजयोग आहे.
या योगानेही या दोन्ही ग्रहांना
बल प्राप्त झाले आहे. लग्न कुंडलीमध्ये चंद्र वृषभ राशीमध्ये उच्चीचा दिसत असला तरी तो कृत्तिका या
क्रुर नक्षत्री आहे. त्यामुळे त्याचे बल कमी झाले
आहे. हे कमी झालेले
बल नवमांशातील या राजयोगाने वाढविले
आहे.
म्हणुनच
एखाद्या ग्रहाचे लग्न कुंडलीतील बलाबल ठरवताना अथवा शुभाशुभत्व ठरवताना त्याच्या नवमांशाचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
- होरापंडीत
मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र
। वास्तुशास्त्र । रमलशास्त्र ।
होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला
केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१
८९७५ ३१२ ०५९ । +९१ २०
२७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com |
https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/
No comments:
Post a Comment