
हा काळ मेष व वृश्चिक राशीसाठी खडतर असणार आहे. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये
मंगळाची महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालु आहे त्यांनी विशेष काळजी
घ्यावयाचा काळ आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष लग्न अथवा वृश्चिक लग्न किंवा मेष रवि अथवा वृश्चिक रवि आहे त्यांनाही याचा त्रास काळ जाणवेल.
मंगळ मिथुन राशीमध्ये असे पर्यंत मिथुन राशीला तर कर्क राशीमध्ये असे पर्यंत कर्क राशीलाही याचा त्रास जाणवेल.
तो मिथुनेत असताना त्याची चौथी दृष्टी कन्या राशीवर, सप्तम दृष्टी धनु
राशीवर तर अष्टम दृष्टी मकर राशीवर असणार आहे. या राशींनाही याचे परिणाम
जाणवतील. तर कर्केत असताना त्याची चौथी दृष्टी तुळ राशीवर, सप्तम दृष्टी
मकर राशीवर तर अष्टम दृष्टी कुंभ राशीवर असेल.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment