हो! सुक्ष्म अभ्यास. इथे सुक्ष्म अभ्यास म्हणण्याचे कारण म्हणजे सध्या
अधिकतर गुण मेलं हे सॉफ्टवेअर वापरुन अथवा घरच्या घरी गुण मेलनाचे कोष्टक
पाहुन केले जाते. त्यातही सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांचा भरणा अधिकच. का तर म्हणे
कॉम्प्युटर कसा चुकु शकेल. पण अस म्हणत असताना आपण हे विसरतो कि
कॉम्प्युटर तेच गणित करतो जे आपण त्याला शिकवलेलं असत किंवा तेच उत्तर देतो
जे आपण त्याला सांगितलेलं असत. अशावेळी गणित किंवा उत्तर भरताना कमी अथवा
चुकीची माहिती भरली असेल तर उत्तरही तसेच येणार. अर्थात याला काही अद्ययावत
सॉफ्टवेअर अपवाद आहेत पण अगदी काहीच.
गुण मेलन करताना एक नाड दोष,
षडाष्टक दोष त्यातही विशेषतः मृत्यु षडाष्टक दोष अत्यंत महत्वाचे कारण
त्यांची परिणाम कारकताही तशीच असते. यातील एक नाड दोषाविषयीचं बोलायचे झाले
तर हा दोष नक्षत्रावरुन येतो. वधु व वराच्या नक्षत्रांची नाड एकच असल्यास
हा दोष येतो. अधिकतर सॉफ्टवेअर एवढ्यावरतीच हा दोष आहे सांगुन गुण जुळतच
नाहीत असे सांगतात अथवा गणित करताना नाडीला असलेले सर्वाधिक गुण ८ गुण वजा
करतात. परंतु शास्त्र एवढ्यावरच थांबलेले नसुन या दोषाच्या परिहारार्थ
नाडीपाद वेध कोष्टक दिलेले आहे. नाडीपाद म्हणजे नक्षत्र चरणावरुन इथे
अभ्यास केला जातो व एक नाड दोष ठरवला जातो.
षडाष्टक दोषाविषयी
देखील हेच सांगता येईल. आपल्याकडे राशींचा व राशी स्वामींचा एकमेकांशी
असलेला संबंध लक्षात घेऊन प्रीती षडाष्टक व मृत्यु षडाष्टक असे वर्ग केले
आहेत. त्याही पुढे जाऊन मुळ कुंडलीतील त्या राशीची तसेच राशीस्वामीची
स्थिती यावरुनही निर्णय घेतला जातो. दोन राशींमध्ये प्रीतीषडाष्टक अथवा शुभ
द्विर्द्वादशकं अथवा शुभ नवपंचम असता पुढे जाण्यास हरकत नाही. तर
मृत्यूषडाष्टक अथवा अशुभ द्विर्द्वादशकं अथवा नेष्ट नवपंचम असता पुढे जाऊ
नये.
गुण मेलना बरोबरच ग्रह मेलन करणे अधिक गरजेचे आहे. पुर्वीच्या
काळी विवाह लवकर होत असल्याने संतती, स्व वास्तु, आर्थिक प्रगती या
गोष्टींसाठी थोडा उशीर झाला तरी चालत असे. वैवाहिक सौख्याचा विचार करता
एकत्र कुटुंबामुळे मनोमिलन झाले नाही'तरी संसार पुढे नक्कीच सरकत असे. पण
सध्या तसे नाहीये. मुलगा असो वा मुलगी विवाहाच्या वयाने किमान अठ्ठाविशी
तरी ओलांडलीये. अशा वेळी संतती तसेच वास्तू या गोष्टींना उशीर झाल्यास अथवा
अडथळे आल्यास आरोग्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक दृष्टीने हे निर्णय अवघड
होत जातात. वाढत्या घटस्फोटांना विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणावर
कारणीभुत आहे. समजावुन घेणारी अथवा समजावुन सांगणारी व्यक्ती भेटली नाही,
तर प्रश्न सुटायच्या नाती तुटत जातात. त्यामुळे वैवाहिक सौख्याच्या
स्थानाचा अभ्यास अनिवार्य आहे.
जे विवेचन आपण वर वाचले ते समजावे
म्हणुन एक गुण मेलन उदाहरणा दाखल देत आहे. या जातकास दोन स्थळे सांगुन आली
होती. गुण मेलनाचा विचार करता, दोन्हींमध्ये अठराच्या पुढे गुण जुळत होते.
तरीही एक स्थळ एक नाड दोषामुळे विविध सॉफ्टवेअरने जातकास पत्रिका जुळत नाही
असे सांगितले. जातकाचे शततारका नक्षत्र तृतीय चरण आहे. तर वधुचे अश्विनी
नक्षत्र प्रथम चरण आहे. दोन्ही नक्षत्रांची आद्य नाड असल्याने पुढे जाऊ नका
असे सांगितले. मात्र हिच नक्षत्र नाडीपाद वेध कोष्टकामध्ये तपासली असता या
दोषाचा परिहार होतो.
ग्रहमेलनाचा विचार करता, जातकाची लग्न रास
मिथुन तर वधुची वृश्चिक येते. इथे मिथुन व वृश्चिक राशीचा षडाष्टक योग आहे.
मात्र वराचे लग्न धनु नवमांशावर तर वधुचे लग्न मीन नवमांशावर उदित होत
असल्याने दोहोंचे नवमांश स्वामी एकच आहेत अथवा मित्र आहेत असे म्हणु.
त्यामुळे या षडाष्टक योगाचा परिहार होतो. जातकाला निश्चिन्तपणे पुढे
जाण्यास सांगितले. याच जातकाला आणखी एक स्थळ सांगुन आले. इथेही वधुचे लग्न
वृश्चिकच आहे. मात्र या वेळी हे लग्न तुळ नवमांशावर उदित होत आहे. आधीच
षडाष्टक त्यात नवमांश स्वामींचे शत्रुत्व यामुळे जातकास ग्रह मेलन होत नसुन
पुढे जाऊ नये असे सांगितले.
प्रत्येक लेखा प्रमाणे इथे हा
उहापोह करण्याचे कारण म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर एवढा सूक्ष्म अभ्यास करेलच
असे नाही. म्हणजेच प्रत्येक सॉफ्टवेअर अचुक उत्तर देईलच असे नाही. म्हणुनच
तज्ञ ज्योतिषांकडुन गुण मेलन तपासणेच अधिक योग्य. इथे दक्षिणा हा विषय
नसुन सूक्ष्म अभ्यास हि गरज आहे.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment