तो वृश्चिकेत २४ ऑगस्ट पर्यंत वक्री असेल व ज्येष्ठा
नक्षत्राच्या चतुर्थ चरणापर्यंत तो मागे येईल तर २५ ऑगस्टला तो मार्गी
होईल. २६ ऑक्टोबरला दुपारी ०३ वाजुन २८ मिनिटांनी तो पुन्हा धनु राशीमध्ये
प्रवेश करेल.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
शनि वृश्चिक राशीमध्ये असताना तुळ राशीला पुन्हा एकदा
साडेसाती सुरु होईल तर मेष व सिंह राशीला पुन्हा एकदा पनौती सुरु होईल. हा
काळ मकर राशीला मात्र काहीकाळ दिलासा देणारा ठरेल.
शनीला तृतीय, सप्तम
व दशम या तीन दृष्टी असतात. तो वृश्चिकेत वक्री असताना त्याची दृष्टी
कन्या, वृषभ व कुंभ या राशींवर राहील तर मार्गी झाल्यानंतर त्याची दृष्टी
मकर, वृषभ व सिंह या राशींवर राहील.
शनिच्या या गोचर भ्रमणाचा परिणाम वर उल्लेखलेल्या राशींना जाणवेल. यामध्ये
चंद्र रास, सूर्य रास तसेच लग्न राशींचा समावेश होतो. तसेच ज्यांच्या जन्म
कुंडलीमध्ये शनिची महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालु आहे त्यांनाही याचे
परिणाम जाणवतील.
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला पापग्रह मानले असले
तरी या गोचर भ्रमणाचा शुभाशुभ परिणाम वर उल्लेखलेल्या राशीच्या प्रत्येक
व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडलीमधील शनिच्या शुभाशुभ स्थिती नुसारच होईल.
शनि हा न्याय व कायद्याचा कारक असल्याने या काळात वरील राशींनी कायद्याला
धरुन व न्याय्य असे वर्तन ठेवल्यास निश्चितच शनि देवांची त्यांच्यावर कृपा
राहील. शनि हा समाजाचा द्योतक असल्याने या काळात यथा शक्ती यथा योग्य अशा
सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभागी व्हावे. याचाही निश्चितच आपल्याला लाभ
होईल. शनिचे रत्न नीलम, अथवा उपरत्न Amethyst किंवा Lapis Lazuli हे आपण या
काळात धारण करु शकता. (तज्ञांच्या सल्ल्याशिवाय रत्न धारण करु नये.) अथवा
शनिचे यंत्र जवळ बाळगु शकता.
अधिक माहितीसाठी वैयक्तिक संपर्क साधावा.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment