या लेखाला सुरुवात करण्यापुर्वी २४ एप्रिल २०१७ च्या व त्यापूर्वीच्या
सर्व नक्षलवादी हल्ल्यांमध्ये शहीद जवानांना माझी श्रद्धांजली.
आपण पूर्वीच्या राजेमहाराजांच्या
कथा वाचतो तेव्हा त्यांच्याकडे राजज्योतिषी असल्याचे पाहतो. तसेच या
राजज्योतिषांनी वेळोवेळी येणाऱ्या ग्रहस्थितींची माहिती दिल्याचेही वाचनात
येते. सध्याच्या काळात तर ज्योतिष शास्त्राचा शात्रोक्त अभ्यास व संशोधन
होत असताना आपल्या राज्य सरकारांकडे या पद्धतीचा राजज्योतिषी अथवा तशी
स्वतंत्र शाखा नाही. या पुर्वी घडुन गेलेल्या घटनांचा ज्योतिष शास्त्रीय
अभ्यास करता प्रत्येक वेळच्या ग्रह स्थितींमध्ये काहीना काही साधर्म्य
आढळते. या साधर्म्याचा अभ्यास करुन जेव्हा तत्सम ग्रहस्थिती येते तेव्हा
सैन्यदलांना पूर्व सूचना देऊन योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न केला जाऊ
शकतो. अशा प्रक्राराच्या अभ्यासाला मेदनीय ज्योतिष असे म्हणले जाते. माझा
मेदनीय ज्योतिषाचा थेट अभ्यास नसला तरी या पूर्वी घडलेल्या घटनांची
ग्रहस्थिती सोबत देत आहे.
२४ एप्रिल २०१७ च्या घटने नंतर सकाळ वृत्तपत्रामध्ये नजीकच्या काही
वर्षांमध्ये घडलेल्या नक्षलवादी हल्ल्यांची एक यादी आली होती. त्यांचा
तपशील येथे देत आहे.
एकुण २४ घटनांचा यात उल्लेख आहे. यातील १३
घटनांमध्ये गुरु वक्री आहे. याशिवाय तब्बल १० घटना गुरु शनीचा केंद्र योग
असताना घडल्या आहेत. शनी गुरु षडाष्टकामध्ये असताना ७ घटना तर शनी मंगळ
षडाष्टक असताना ४ घटना घडल्या आहेत. शनि मंगळाच्या केंद्र योगाचाही यात
मोठा हात असुन तब्बल आठ घटना म्हणजे एक तृतीयांश घटना या काळात घडल्या
आहेत. त्यातही ३ वेळा गुरु शनीची युती आहे. मंगळ कर्क राशीमध्ये असताना
बॉम्ब स्फोट होतात याचा माझा स्वतंत्र अभ्यास आहे. पण इथे मंगळ कर्क
राशीमध्ये असताना ३ वेळा नक्षलवादी हल्ले झाले आहेत.
मेदनीय
ज्योतिषामध्ये भारताची मकर रास धरली आहे. या अर्थाने जेव्हा जेव्हा शनी बदल
होतो तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम भारतावर जाणवतात. नजीकच्या काही
वर्षांमध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले व नक्षलवादी हल्ले शनि सिंह राशीमध्ये
असताना झाले आहेत. मकर राशीमध्ये मंगळ उच्चीचा तर गुरु नीचेचा असतो. मंगळ -
गुरूचा शनीशी आलेला संबंध या घटनांसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरलेला वरील
विवेचनावरुन आढळेल.
सोबत दिलेल्या कुंडल्या चंद्र कुंडल्या
मांडल्या आहेत. घटना घडलेल्या वेळेचा अधिक सुक्ष्म अभ्यास करुन अधिक फलित
मांडता येऊ शकेल. या सर्वांचा इथे उहापोह करण्याचा उद्देश म्हणजे या
शास्त्राचा आधार घेऊन सरंक्षण दले पुढे घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेऊ शकतात.
या घटना आपल्याला टाळता निश्चितच येणार नाहीत, पण त्यांच्याशी लढायची
पूर्वतयारी आपण करु शकु.
हा अभ्यास वाचकांनी पुढे शेअर करावा. व तो योग्य हातांपर्यंत पोहचावा हीच यामागची इच्छा.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment