औद्योगिक वास्तुशास्त्र म्हणजेच औद्योगिक जागेचे वास्तुशास्त्र. जेथे
कच्च्या मालावर प्रक्रिया करुन नविन उत्पादन तयार केले जाते अशा जागेचे
वास्तुशास्त्र. वास्तु मग ती कुठलीही असो, पंचमहाभुतांचे नियम तेच आणि तसेच
असतात. फक्त त्यांचा वास्तुसापेक्ष विचार वेगळा केलेला असतो. घरामध्ये
नैऋत्य भागामध्ये घराच्या मालकाचे शयनगृह - मुख्य शयनगृह करुन त्या दिशेचे
जडत्व वाढवले जाते. कारखान्यामध्ये नैऋत्य भागात व्यवसायाच्या मालकाचे
कार्यालय करुन अथवा तुलनेने अधिक वस्तुमान असलेलले यंत्र ठेवुन अथवा कच्चा
माल ठेवुन त्या दिशेचे जडत्व वाढवले जाते. असे प्रत्येक दिशेविषयी स्वतंत्र
सांगता येईल.
खरं तर औद्योगिक वास्तुशास्त्राविषयी या पुर्वीही
लेख लिहिले आहेत. तरी पुन्हा लेख लिहिण्याची उठाठेव कशाला? खुपदा
वास्तुशास्त्रातील काही बाबींविषयी सविस्तर लिहायचे राहुन जाते. नुकत्याच
एका कारखान्याची वास्तु तपासण्याचा योग आला. त्यावेळी अशाच काही महत्वाच्या
मुद्द्यांवर पुनर्भ्यास झाला. त्याविषयीचं हा लेख आहे.
कारखाना
म्हणले कि अनेक छोटया-मोठ्या यंत्रांनी तो बनलेला असतो. अशा वेळी
कार्यालयीन कामकाजासाठी तसेच मालकाच्या कामकाजासाठी कार्यालय कुठे करायचे
असा प्रश्न पडतो. असे कार्यालयासाठी सर्वप्रथम दक्षिण दिशेला प्राधान्य
द्यावे. दक्षिण मध्य भागात पण दक्षिण सीमेला लागुन असे कार्यालय केल्यास
अधिक उत्तम. त्या खालोखाल पश्चिम मध्यम भागाला पश्चिम सीमेला लागुन
कार्यालय करण्याला महत्व द्यावे. दक्षिण अथवा पश्चिम मध्य भागात न जमल्यास
नैऋत्य भागात सीमारेषेच्या काहीसे पुढे असे कार्यालय करावे. कार्यालयातील
विशेष करुन मालकाच्या जागेची रचना करताना मालकाला बसल्या जागेवरुन संपुर्ण
कारखान्यावर नजर टाकता येईल असे पहावे. मालकाची पाठ दक्षिण अथवा पश्चिम
दिशेला तर तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला यायला हवे.
कारखान्यामध्ये
वास्तुशास्त्राचे नियम लावत असताना उत्पादनाच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास
करणे गरजेचे आहे. प्रत्येक यंत्राचे आकारमान व वस्तुमान विचारात घ्यायला
हवे. काही यंत्रे आकारामानानी मोठी असतात पण वस्तुमान हलके असते, तर काही
यंत्रे आकारमानाने अगदीच लहान असतात पण त्यांचे वस्तुमान अधिक असते. याचा
एकत्रित मेळ उत्पादनाच्या प्रक्रियेशी लावुन यंत्रांची जागा निश्चित करावी.
अग्नीशी संदर्भातील प्रक्रिया दक्षिण आग्नेय भागात व्हायला हवी. ज्वलनशील
रासायनिक प्रक्रियाही दक्षिण आग्नेय भागात व्हायला हवी. वस्तुमान
दक्षिणेकडुन पुर्वेकडे अथवा पश्चिमेकडून उत्तरेकडे कमी होत जाणारे हवे.
मोठी यंत्रे ब्रह्मस्थानात येणार नाहीत याचा प्रयत्न असावा. याउलट तुलनेने
लहान यंत्रे ब्रह्मस्थानात आली तर हरकत नाही. उत्पादनाची प्रक्रिया वायव्य
भागात संपुन वायव्येला तयार उत्पादन बाहेर पडायला हवे. तयार उत्पादनाचा
साठा प्राधान्याने पश्चिम उत्तर भागात असावा. त्या पुढे वाढत जाऊन उत्तर
पश्चिम भागात न्यावा.
माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत
अभियानाने सर्वच प्रेरित झाले आहेत. हे अभियान कारखान्यापर्यंत यायला हवे.
कारखाना नेहमीच नीटनेटका असावा. प्रत्येक वस्तु कामानंतर जागच्या जागी
ठेवलेली असावी. आपल्यावर (आपल्या कारखान्यावर) श्री महालक्ष्मी देवीचा
आशीर्वाद नेहमीच असावा असे वाटत असेल तर कारखान्यात कमालीची स्वच्छता
ठेवायला हवी. पाण्याची तसेच विश्रांतीची व्यवस्था ईशान्य भागात असावी.
कारखान्यामध्ये कुठल्याच धर्माचे उपासना मंदिर असु नये. करावयाचे झाल्यास
ते ईशान्य भागात पण अगदीच छोटेखानी असावे.
।।अणुपासुनी ब्रह्मांडा
एवढा होत जातसे।। असे संतश्रेष्ठ समर्थ रामदासांचे वचन आहे. त्याप्रमाणे या
जगातील प्रत्येक अणुरेणु एक वास्तु आहे. कारखाना हा त्यातीलच एक भाग आहे.
आपल्या वास्तुत आपल्याला थांबावेसे काम करावेसे वाटले पाहिजे, आपल्या
कामगाराला वाटले पाहिजे. जे उप्तादन आपण करु ते गुणवत्तेच्या बाबतीत
श्रेष्ठ पाहिजे. तरच आपली प्रगती होऊ शकते. आणि म्हणुनच कारखान्याची रचना
करताना औद्योगिक वास्तुशास्त्रालाही महत्व दिले पाहिजे.
सोबत नुकत्याच भेट दिलेल्या वास्तुची आम्ही केलेली रचना जोडत आहे.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment