ज्या प्रमाणे वैद्यकीय शाखा स्वतंत्र असल्या तरी रोगाचे निदान एकच होत
असते, त्याच पद्धतीने ज्योतिषाच्या स्वतंत्र अनेक शाखा आहेत पण त्यातुन
सांगितले जाणारे फलित एकच असते. किंबहुना मी सातत्याने मांडत आलो आहे, कि
ज्योतिषाची विविध अंगे एकमेकांच्या हातात हात घालुन पुढे जात असतात. माझ्या
ज्योतिष कार्यालयात जेव्हा एखादा जातक येतो, तेव्हा होराशास्त्रा बरोबरच
रमल शास्त्राच्या माध्यमातुनही त्याची कुंडली मांडली जाते आणि भाकीत करत
असताना या दोन्ही कुंडलीचा एकमेकांशी मेळ घातला जातो. काही वेळेस जन्म
कुंडली आपल्याशी पटकन बोलत नाही. अशावेळी तिला बोलकं करायला प्रश्न कुंडली
मदत करते.
अशाच एका जातकाची जन्म कुंडली, मार्गदर्शनाच्या वेळी मांडलेली प्रश्न कुंडली व रमल कुंडली सोबत जोडली आहे.
जन्म कुंडलीची सिद्धता जन्म कालीन आकाशस्थ ग्रह आणि त्यांचे पृथ्वी वरुन
मांडलेले गणिती अवलोकन या पद्धतीने करता येते. प्रश्न कुंडलीची सिद्धताही
सद्यकालीन आकाशस्थ ग्रह आणि त्यांचे पृथ्वी वरुन मांडलेले गणिती अवलोकन या
पद्धतीने करता येते. रमल कुंडलीचे मात्र तसे नाही. फासे पद्धतीने अथवा
चित्र पद्धतीने काही चिन्हे मांडली जातात. पुढे त्याचे असे एक सुत्र आहे,
त्या सुत्राने कुंडली सोडवत जावे लागते. इथे या कुंडलीची येणारी प्रचिती,
तंतोतंत येणारे भाकीत हिच सिद्धता आहे.
सोबत दिलेल्या जन्म कुंडली
मध्ये लग्नेश रवि लाभात मिथुनेचा आर्द्रा नक्षत्री म्हणजेच राहुच्या
नक्षत्री मकर नवमांशी म्हणजेच शनिच्या नवमांशी आहे. यामुळे लग्नेशाला बळ
नाही. त्यातच भरीस भर तृतीयात शनि वक्री असुन वक्री मार्गाने त्याची तृतीय
दृष्टी लग्न स्थानावर आली आहे. यामुळे लग्न स्थानालाही बळ नाही.
आता आपण याच जातकाची रमल कुंडली पाहु.
रमल कुंडलीतील प्रथम स्थानात पुढील शकल आले आहे.
०
-
-
०
उकला असे या शकलाचे नाव असुन ते अति अशुभ शकल आहे.
याचाच अर्थ जन्म कुंडली व रमल कुंडली एकमेकांशी साधर्म्य ठेवते.
आणखी स्थाने पाहु. जन्म कुंडली मध्ये दशमेश शुक्र व्यय स्थानामध्ये आश्लेषा नक्षत्री आहे. आपण रमल कुंडलीमधील दशम स्थान पहाल तर इथे पुढील शकल आले आहे.
०
-
०
-
कब्जतुल असे या शकलाचे नाव असुन हे हि अति अशुभ नक्षत्र आहे.
आता याही पुढे जाऊन फलिताची प्रचिती पहा.
आपण जर प्रश्न कुंडली पाहिलीत तर दशमातच शुक्र मीनेचा उच्चीचा आला आहे. तर जन्म कुंडलीमध्ये शुक्र जरी व्ययात गेला असला तरी तो गुरुने दृष्ट आहे व चंद्राशी त्याची प्रतियुती आहे. चंद्र दशमात शनि उच्चीचा आहे (मात्र तो वक्री आहे).
जन्म कुंडली व प्रश्न कुंडली यांचा मेळ घालता दशमस्थानाचे सद्य भाकीत अगदीच अशुभ करणे योग्य ठरणार नाही. किंबहुना शुक्र मीनेत असे पर्यंत कामे मार्गी लागुन अडचणी सुटण्यास मदत होईल असेही भाकीत वर्तवता येईल. हेच फलित आपल्याला रमल कुंडलीमध्येही दिसुन येते. रमल कुंडलीमध्ये एखाद्या स्थानाचे भाकीत करताना त्या स्थानातील शकलाचा प्रथम स्थानातील शकलाशी गुणाकार करावा लागतो .
प्रथम स्थान x दशम स्थान = गुणाकार
० ० = -
- - = -
- ० = ०
० - = ०
गुणाकार करुन आलेल्या शकलाचे नाव नस्रतुल असुन हे अति शुभ शकल आहे.
या वरुनच प्रश्न कुंडलीतील ग्रहस्थिती व रमल कुंडलीतील ग्रहस्थिती ही एकमेकांशी साधर्म्य दाखवते.
असाच अभ्यास विवाह स्थानाविषयी सांगता येईल. या जातकाच्या करिअर मध्ये
सध्या काही अडचणी चालु असुन त्यामुळे जातकाने विवाहाचा निर्णय लांबणीवर
टाकला आहे.
इथे लग्न कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कुंभ रास आली
असुन सप्तमेश शनि तृतीयात म्हणजेच स्वस्थानापासुन भाग्यात उच्चीचा आहे. इथे
तो वक्री असल्याने त्याच्या फलितामध्ये निश्चितच कमतरता आली आहे. सध्या
जातकाची गुरुची महादशा चालु असुन त्यात शुक्र अंतर्दशा आहे. त्या नंतर
येणाऱ्या रविच्या अंतर्दशेत जातकाचा विवाह होईल असे माझे फलित आहे. प्रश्न
कुंडलीमध्ये सप्तमातच शनि धनु राशीचा आला आहे तर सप्तमेश गुरु चतुर्थात
कन्येचा आहे. त्यामुळे तो शनि धनु राशीत असतानाच गुरु तुळ राशीत आला असता
विवाह योग दर्शवतो.
आता रमल कुंडलीवरुन सप्तम स्थान तपासु. सप्तमात पुढील शकल आले आहे. -
०
०
-
या शकलाचे नाव इज्जतमा असुन हे मध्यम शुभ आहे. जन्म कुंडलीतील विवाह स्थानाविषयी आपण वरती हेच म्हणले आहे. आता सप्तमातील शकलाचा प्रथम स्थानातील शकलाशी गुणाकार करु.
हे विश्लेषण प्रत्येक स्थानाविषयी करता येऊ शकते. इथे लग्न स्थान व दशम स्थान उदाहरणा दाखल घेतले आहे.
प्रथम स्थान x सप्तम स्थान = गुणाकार
० - = ०
- ० = ०
- ० = ०
० - = ०
गुणाकार करुन आलेल्या शकलाचे नाव तरीख असुन हे एक शुभ शकल आहे. पुन्हा
एकदा रमल कुंडलीतील ग्रहस्थिती प्रश्न कुंडलीशी साधर्म्य दाखवते.
आपण इथे लग्न स्थान, विवाह स्थान, तसेच दशम स्थानाचा अभ्यास मांडला. या पद्धतीने प्रत्येक स्थानाचा स्वतंत्र अभ्यास सांगता येईल.
वरील अभ्यासातुन सर्वप्रथम ज्योतिष शास्त्राचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
दुसरा भाग असा कि जन्म कुंडलीबरोबर प्रश्न कुंडलीच्या अभ्यासाचे महत्व
विशारद होते. आणि तिसरा व महत्वाचा भाग असा कि जरी आपल्याला आपले जन्म टिपण
माहित नसले तरी रमल शास्त्राच्या आधारे आपले भविष्य वर्तवता येते.
टिप: ज्यांचा रमल शास्त्राचा अभ्यास असेल त्यांच्या लक्षात आले असेल कि
सप्तम स्थान व प्रथम स्थानाचा गुणाकार करुन जे शकल आले ते 'कुंडलीत कुठेच
दिसत नाही. हि कुंडली मांडताना जातकाने मनात फक्त करिअर संदर्भातला प्रश्न
धरला होता. त्यामुळे या कुंडलीतून विवाहाचे उत्तर मिळु शकले नाही.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/
No comments:
Post a Comment