Saturday, 11 February 2017

ग्रहांची वक्री दृष्टी



एखादा ग्रह वक्री असेल तर त्याची दृष्टी सुद्धा तशीच तपासली पाहिजे.

उदाहरणा दाखल सोबत तीन कुंडल्या दिल्या आहेत. या एकाच दिवशीच्या आहेत. यात मंगळ, गुरु, शनि व बुध वक्री आहेत.

मंगळ ग्रहाला तीन पुर्ण दृष्टी आहेत. चतुर्थ, सप्तम व अष्टम. इथे मंगळ मार्गी आहे असे धरले तर त्याची दृष्टी सप्तमावर, दशमावर व लाभावर येते. मात्र इथे मंगळ वक्री असल्याने त्याच्या फलिताचा अभ्यास करताना मंगळाची दृष्टी लग्नावर, दशमावर व भाग्यावर धरायला हवी.

शनि ग्रहालाही तीन पुर्ण दृष्ट्या आहेत. तृतीय, सप्तम व दशम. शनि मार्गी म्हणलं तर त्याची दृष्टी षष्ठावर, दशमावर व लग्नावर यायला हवी. पण तो वक्री असल्याने फलिताचा अभ्यास करताना त्याची दृष्टी धनावर, दशमावर व सप्तमावर धरायला हवी.

हाच नियम गुरुलाही लागु पडतो. गुरुला पंचम, सप्तम व नवम अशा तीन पुर्ण दृष्टी आहेत. तीनही दृष्टींचे फलित एक सारखेच असते. त्यामुळे इथे गुरु वक्री झाला तरी त्याची दृष्टी तशीच राहते. जसे कि गुरु मार्गी असता त्याची पंचम दृष्टी पंचमावर सप्तम सप्तमावर तर नवम धाग्यावर येते. वक्री मार्गाचा विचार केला तरी पंचम भाग्यावर, सप्तम सप्तमावर तर नवम पंचमावर येते.

ग्रह वक्री असला तरी त्याच्या स्थानागत सप्तम दृष्टीमध्ये फरक पडत नाही. जसे कि इथे बुध वक्री असला किंवा मार्गी असला तरी त्याची दृष्टी तृतीयावरच राहील. तोच भाग आपण वरती मंगळ, शनि व गुरुच्या बाबतीतही पाहु शकतो.

वरील नियम जन्म कुंडलीतील ग्रहयोग तपासताना जसा लागु पडतो, तसाच गोचर ग्रहांचा अभ्यास करतानाही लागु पडतो.

वरील कुंडलीतील आणखी एका भागावर प्रकाश टाकावासा वाटतो म्हणजे या कुंडलीमध्ये राहु स्तंभी आहे. एवढेच काय पण या पुढील दोन दिवस तो मार्गीही झाला आहे. आपल्याकडे अनेक ज्योतिषी राहु-केतु कायम वक्री असल्याचे सांगतात. पण अनेक कुंडल्यांमध्ये ते मार्गी अथवा स्तंभी असलेले दिसतील.

या पद्धतीने आपल्या कुंडलीतील वक्री ग्रहांचे फलित तपासणे योग्य राहील.   

होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७ | info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment