Wednesday, 22 February 2017

शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या घडामोडींविषयी ज्योतिषीय पद्धतीने मार्गदर्शन

सध्या मोठ्याप्रमाणावर लोक शेअर मार्केटकडे वळायला लागली आहेत. यात म्युच्युअल फंड सारखी सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी थेट मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. इथे झटपट मिळणाऱ्या नफ्यामुळे तरुण लवकर आकर्षित होत आहेत तर इथे असलेल्या जोखमीमुळे मध्यमवयीन अद्याप सावध भुमिका घेऊन आहेत. जेव्हा आपण एखादा शेअर खरेदी करत असतो तेव्हा तो कोणीतरी विक्री करत असतो. आणि आपण घेतलेला शेअर जेव्हा आपण विक्री करत असतो तेव्हा कोणीना कोणी तो खरेदी करत असतो. खरेदी विक्रीच्या व्यवहारात एकाला फायदा तर एकाला नुकसान होत असते. काहीवेळेस संमिश्र परिस्थितीही असते.

आपण पृथ्वीवर वास्तव्य करत असताना आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत असतो. ग्रहांच्या बदलांचा परिणाम जसा सजीवांवर होतो तसाच तो निर्जीव वस्तुंवर देखील होत असतो. आकाशातील नक्षत्र बदलांवर पाऊस पाण्याचे भाकीत आपल्याकडे केले जाते व बहुतांश वेळा ते तंतोतंत जुळतेही. प्रादेशिक घडामोडींवर भाकीत करणारी स्वतंत्र मेदनीय ज्योतिष शाखा आपल्याकडे आहे. त्यातुन केले जाणारे भाकीतही बव्हंशी तसेच्या तसे जुळुन येते. आपल्याकडे दाते पंचांगातुन दरवर्षी धनधान्य व्यापार या विषयी संपुर्ण वर्षभराचे भविष्य वर्तविले जाते. त्याच्या सत्यतेचा एक भाग नोटाबंदीच्या वेळी आपण बघितला हि होता. त्यावेळी थेट नोटा बंदी असा शब्दोल्लेख जरी नसला तरी त्यावेळी झालेल्या घडामोडींच्या जवळ जाणारे भविष्य वर्तविले होते.

शेअर मार्केटचेही तसेच आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या स्वतंत्र कुंडल्यांचा अभ्यास इथे महत्वाचा ठरतो. त्यांच्या नक्षत्र गोचरीचा तसेच ग्रह गोचरीचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्यानंतर दैनंदिन ग्रह गोचरीचा संबंध येतो. वेळोवेळी बदलणारी लग्न रास हि इथे अधिक प्रभावी ठरते. त्यानंतर लग्नेशाची स्थिती अभ्यासणे ठरते. गेल्या काही काळात मेष लग्नाला लग्नेश व्ययात तर मिथुन लग्नाला बुध अष्टमात या काळातील मार्केटची स्थिती बघा. या उलट वृषभ लग्नाला लग्नेश लाभात उच्चीचा. या काळातील मार्केटची स्थिती बघा. शनि वृश्चिकेतुन बाहेर पडल्यापासुन सिमेंट क्षेत्रातील शेअर्स, शुक्र मीनेत उच्चीचा झाल्यापासुन वाहन क्षेत्रातील शेअर्स, गेल्या वर्षात गुरु सिंहेत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स यांची स्थिती बघा.

या सर्वात चंद्राचे भ्रमण अत्यंत महत्वाचे ठरते. चंद्र नक्षत्र, चंद्र नवमांश याचा शेअर मार्केटवर खूप फरक जाणवतो. वृषभेचा चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतानाचे मार्केट आणि तोच चंद्र रोहिणी नक्षत्रात असतानाचे मार्केट यात फरक आहे. चंद्राचा परिणाम जसा एखाद्या शेअर वर होतो तसाच तो शेअर खरेदी अथवा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीवरही होत असतो. जसे कि सिह रास उत्तरा नक्षत्री चंद्र असता अविचाराने अथवा अफवांमुळे शेअर्सची खरेदी अथवा विक्री केली जाते. कर्क रास आश्लेषा नक्षत्री चंद्र असता व्यवहार करताना मनात अस्वस्थता जाणवते तर कधी कधी नुकसानीच्या भीतीने व्यवहार केले जातात.

मी शेअर मार्केटमध्ये मार्गदर्शन करताना आठवड्याचे भाकीत करतो. यात आठवड्यातील प्रत्येक दिवस कसा असेल इथपासुन ते कोणत्या क्षेत्रातील शेअर्स तेजीत असतील याचे मार्गदर्शन केले जाते. तसेच कोणत्या वेळात व्यवहार करावा तर कोणत्या वेळात करु नये याचे मार्गदर्शन केले जाते. शेअर मार्केटमध्ये सर्वांना सहज व्यवहार करता यावा तसेच अधिकाधिक फायदा व कमीत कमी नुकसान व्हावे एवढेच माझे यामागे उद्दिष्ट आहे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७ | info.bhagyank@gmail.com

2 comments:

  1. Is this consultation is free or paid service. Which shares you are going to suggest

    ReplyDelete
    Replies
    1. This is paid services. We share market review weekly.

      Delete