ज्या
जातकाची लग्न कुंडली सोबत जोडली आहे, त्या जातकाच्या आईने पहिल्यांदा आपल्याशी संपर्क केला होता. हि एका तरुणीची
कुंडली असुन ती एका नामांकित
बी पी ओ कंपनीमध्ये
कामाला आहे. तिच्या लहानपणीच तिच्या वडिलांनी तिला व आईला एकटे
सोडले. तिच्या आईने मोठ्या कष्टाने तिला वाढविले. त्या
मुलीला तिच्या कंपनीतुन मागच्याच महिन्यात परदेशगमनाची संधी विचारण्यात आली. पण आईला एकटे
सोडुन कसे जायचे या चिंतेने ती
हो नाही करत होती. त्याच वेळी पहिल्यांदाच घरापासुन दूर जायचे असल्याने हि संधी आपल्यासाठी
कशी असेल याची काळजीही मनामध्ये होती.
या
जातकाच्या आईने फोनवरुन आपल्याशी संपर्क साधला. मी त्यांना आपल्याकडे
उपलब्ध विविध सुविधा व त्यांची दक्षिण
सांगितली. On Phone
Consultation चे महत्व माझ्याकडुन सांगितले व त्यांना ते
पटलेही. यावेळी मार्गदर्शन दोन टप्प्यात करण्यात आले. आईशी व मुलीशी दोन
स्वतंत्र चर्चा झाल्या. या चर्चेनंतर आलेला
अभिप्राय मी मागे एकदा
पोस्टही केला होता. आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर जातक परदेशी जायला तयार झाली. जाण्यापूर्वी एक आशीर्वाद म्हणुन
तिने आपण सुचविलेल्या रत्नाचे पेंडंटही करुन घेतले. सध्या हि जातक परदेशात
असुन तिचे उत्तम चालले आहे.
तूळ
लग्नाची हि कुंडली असुन
लग्नेश शुक्र दशमात कर्केचा आहे. तृतीय स्थान म्हणजेच प्रवास स्थानाचा कारक गुरु ग्रह दशमात उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये स्व नवमांशी आहे. दशमेश चंद्र लाभात तर लाभेश रवि
भाग्यात आहे. दशमातच मंगळ नीचेचा असला तरी शनिने त्याचा नीच भंग केला असुन हा एक राजयोग
आहे. शनिची थेट सप्तम दृष्टी दशमावर आहे. व्यय स्थानाचा कारक बुध भाग्यात स्वस्थानी आहे. त्याचा मंगळाशी नक्षत्रातुन अन्योन्य योग हा राजयोग झालेला
आहे. सध्या रविची महादशा चालु असुन रवि भाग्य स्थानामध्ये व्ययेश बुधा बरोबर आहे. रविमध्ये शुक्र अंतर्दशा असुन शुक्र दशमामध्ये आहे. जातक मे महिन्यामध्ये परदेशी
गेला असुन या काळात राहुची
विदशा चालु होती. राहु तृतीय स्थानामध्ये आहे.
म्हणजेच
भाग्यामध्ये लाभेश व भाग्येश-व्ययेश
एकत्र तर दशमामध्ये लग्नेश,
धनेश व तृतीयेश एकत्र
अशी ग्रहस्थिती आहे. महादशा स्वामी लाभेश असुन भाग्य स्थानामध्ये, अंतर्दशा स्वामी लग्नेश असुन दशमामध्ये व विदशा स्वामी
राहु तृतीयामध्ये. हि ग्रहस्थिती परदेशगमनासाठी सर्वोत्तम
असल्याने व परदेशगमनातुन करिअरला
एक चांगले वळण देणारी असल्याने जातकास हि संधी स्वीकारण्यास
सांगितले. व आधी म्हणल्याप्रमाणे
कंपनीमध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये व प्रशिक्षणामध्ये जातक उत्तीर्ण
होऊन परदेशी मार्गस्थही झाला. जाण्यापूर्वी त्याने बुध ग्रहाचा प्रभाव असलेल्या जेड या रत्नाचे पेंडंट
आपल्याकडुन बनवून घेतले.
या
लेखाचा उहापोह करण्याचा उद्देश इतकाच कि आपणही करिअरमधील
महत्वाचे निर्णय घेताना, एखादी संधी स्वीकारताना अथवा नाकारताना एकदा मार्गदर्शन जरुर घ्यावे.
- होरापंडीत
मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र
। वास्तुशास्त्र । रमलशास्त्र ।
होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला
केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO
9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५
३१२ ०५९ । +९१ २० २७२८
०८३७
info.bhagyank@gmail.com
| https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/
No comments:
Post a Comment