Saturday, 17 February 2018

विवाहयोग व रत्नशास्त्र

एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीचा अभ्यास करुन त्याचा विवाह योग सांगणे हा फलज्योतिषाचा भाग झाला. हा विवाहयोग जुळून यावा, सुयोग्य जोडीदार मिळावा व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी रत्नशास्त्राची मदत घेता येते.

ह्या जातकाचे वडील साधारण दोन आठवड्यांपूर्वी माझ्या नव्या ज्योतिष कार्यालयामध्ये आले होते. मुलाला मनासारखी नोकरी नाही. नोकरी नाही तर छोकरीपण नाही असाच त्यांचा सूर होता. एकीकडे मुलाचे वय मात्र वाढत चाललेले. त्यामुळे जाणारा प्रत्येक'दिवस काळजीमध्ये अधिक भर घालणारा होत होता. नक्की पुढे कसे जावे याचाच प्रश्न त्यांच्या मनात घोळत होत होता.

आपण मुलाची रीतसर कुंडली अभ्यासली. लग्नी मीन हि द्विस्वभावाची राशी तर चंद्र रास हि तीच. लग्नेश गुरु लग्नी असला तरी तो राहु बरोबर होता. इथे तो थेट राहुच्या युतीमध्ये नसला तरी राहुचा परिणाम थोडा तरी होणारच. पंचमेश चंद्र लग्नी राजयोगी असला तरी तो अंशात्मक दृष्ट्या राहुच्या युतीमध्ये असल्याने ग्रहणयोग होत आहे. एकीकडे द्विस्वभाव राशी दुसरीकडे चांडाळ योग ग्रहण योग यांचे सावट. जातक प्रचंड तणावाखाली वावरत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

सप्तमात बुधाची कन्या रास तर सप्तमेश बुध लाभ स्थानामध्ये मित्र राशीमध्ये. सप्तमात केतु तर सप्तमावर गुरु, चंद्र,राहु व शनिची थेट दृष्टी. सप्तमाशी शनिचा थेट संबंध आला कि विवाहयोग तिशीच्या पुढे जातो. स्वतः राहु=केतुचे वय ३२ वर्षे असुन तोवर लग्न होत नाही. या अर्थाने २०२० च्या पहिल्या तिमाही पर्यंत जातकाचे लग्न होत नाही.

सध्या त्याच्या कुंडलीमध्ये सप्तमेशाचीच महादशा (बुध महादशा) चालु आहे. तर बुधामध्ये गुरुची अंतर्दशा चालु आहे. एप्रिल २०१९ नंतर शनि अंतर्दशा सुरु होईल. तेव्हा शनिचे मकरेतुन म्हणजेच जन्म कुंडलीच्या लाभातुन भ्रमण होईल. तर मार्च २०१९ नंतर गुरुचेही मकरेतुन म्हणजेच जन्म कुंडलीच्या लाभातुन भ्रमण होईल. आणि अगदी याच काळात जातकाचा विवाह होईल.

मात्र यासाठी जातकाने स्वतःच्या पायावर स्थिर होणे गरजेचे आहे. तरच त्याला मनाजोगे स्थळ मिळु शकेल. सद्य ग्रहस्थिती, जातकाचे प्रश्न व पुढील ध्येय यांचा एकत्रित विचार करुन जातकास बुधाचे जेड हे रत्न धारण करण्यास सांगितले. सद्य महादशा बुधाचीच असुन तो सुख स्थानाचाही कारक आहे. त्यामुळे हे रत्न अडचणींमधुन मार्ग काढुन जातकाला योग्य दिशेने पुढे जाण्यात मदत करेल. विवाह योगाच्या काळात अवाजवी अपेक्षा न धरता आपल्याला साजेशी अश्या जोडीदाराची निवड करायला हे रत्न मदत करेल.

या पद्धतीने आपणही आपला विवाहयोग तपासुन रत्न धारण करु शकता.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/PerfectlyMatchingGemstone/  

Sunday, 11 February 2018

हस्तसामुद्रिकशास्त्र व भाग्योदायी रत्न

माझे ज्योतिष कार्यालय सांगावी सारख्या भागात आहे, जिथे आजही अनेकांना आपली जन्म तारीखही नक्की माहित नाही. तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळ्या सराफांकडे माझे रत्नविषयक मार्गदर्शन चालते. अशावेळी माझे शेतकरी बंधु रत्नांचे मार्गदर्शन घ्यायला येतात. पारनेरच्या कार्यक्रमात तर दोन दिवसात दोनशेहून अधिक शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करण्याचा योग आला होता.

या व्यक्तींकडे आपली जन्म तारीखच नाही, तिथे जन्म पत्रिका काय बघणार. अशावेळी त्यांच्या हस्तरेषांचा अभ्यास करुन त्यांना रत्न विषयक मार्गदर्शन करावे लागते. हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार रत्न मार्गदर्शन करताना प्रत्येक ग्रहाच्या रेषा, त्यांचा उठाव/रंग, प्रत्येक ग्रहाचा उंचवटा, बोटावरची पेरं, त्यांच्यावरील रेषा या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. जातकाची सामाजिक स्थिती, वैवाहिक स्थिती, नोकरी/व्यवसायाचे स्वरुप या सर्वांचा संदर्भ घ्यावा लागतो. जातकाच्या सद्य अडचणी समजुन घ्याव्या लागतात. मग त्या अडचणींना अनुकूल असे रत्न सुचवावे लागते.

उदाहरणा दाखल सोबत एका हाताचा फोटो दिला आहे. हा जातक एका सराफाकडे सेल्समन म्हणुन कामाला आहे. या जातकाचे नुकतेच करिअर सुरु झाले असुन त्याला सेल्स लाईन मध्येच प्रगती करायची आहे. या जातकाच्या हाताची ठेवणं पाहता तमगुणी हात आहे. गुरु व रविच्या उंचवट्यांची स्थिती चांगली आहे. गुरु उंचवट्यावर शुभ असे फुली चिन्ह आहे. परंतु या सर्वांपेक्षाही बुध उंचवटयाचा अधिक विकास झाला आहे. त्यातच धन रेषेकडून निघालेली बुध रेषा अधिक उजळ व सरळ आहे. त्यातच या जातकाला सेल्स लाईनमध्ये प्रगती करावयाची असल्याने त्याला बुधाचे पाठबळ वाढविणे गरजेचे आहे. म्हणुन जातकाला बुधाचे जेड हे रत्न सुचविले.

अशाप्रकारे हस्तसामुद्रिक शास्त्राच्या आधारे आपले ग्रहबल तपासुन आपल्या भाग्योदायी रत्नाविषयीचे मार्गदर्शन करता येते. ज्यांना आपली जन्म तारीख अथवा जन्मवेळ निश्चित माहिती नाही ते सुद्धा या प्रकारे आपला हात दाखवुन रत्नांविषयक मार्गदर्शन घेऊ शकतात.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/PerfectlyMatchingGemstone/

Friday, 9 February 2018

आपल्या दक्षिणोत्तर दिशांसाठी चित्र साधना ...




आपल्या आयुष्यात सर्वच काही आलबेल चालु असते असे नाही. अशावेळी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना चढ उत्तरांना सामोरे जात असताना आपली वास्तूही आपल्या पाठीशी उभी असते. कारण मी नेहमी सांगतो कि आपल्या दिवसाची सुरवात आपल्या वास्तूमधुन होते तर दिवसाचा शेवटही आपल्या वास्तूमध्येच होतो.

मग या वास्तूमधील दिशांचा प्रेरणा म्हणुन आपण सहज वापर करु शकतो.

आपल्या प्रगतीमध्ये दक्षिण दिशेचा वाटा महत्वाचा असतो कारण हि स्थिर दिशा आहे. इथे येऊन आपण स्थिरावतो, विसावा घेतो आणि परत मार्गक्रमणाला लागतो. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात, क्रेडिट कार्ड किंवा इझी लोनच्या जगात आपण काहीना काही कारणाने कर्ज घेत असतो. काही कर्ज सहज सुटतात, तर काही कर्ज एकेक दिवस मोजत सुटतात. अशावेळी आपल्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला मोराचे पीस लावले असता हि कर्ज मार्गी लागायला काही प्रमाणात मदत होते. आता हे मोराचे पीस सहजासहजी उपलब्ध होईलच असे नाही. उपलब्ध झाले तरी ते चांगले टीकेलाच असे नाही. दुसरे असे कि नुसते मोराचे पीस लावले तर दहा जण प्रश्न विचारातील. यापेक्षा सोबत दिलेल्या मोराच्या जोडीचे चित्र लावले असता आपले ईप्सितही साध्य होते कोणाला काही कळूनही येत नाही. आपली दक्षिण दिशा सुशोभित होते ते वेगळेच.

आपल्याकडे उत्तर दिशेचे स्वामित्व कुबेर देवतेकडे दिले आहे. हि देवता उत्तरेकडुन आपल्या वास्तूकडे पाहात असते. घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी म्हणुन आशिर्वाद देत असते. अशावेळी आपली उत्तर दिशा मोकळी स्वच्छ प्रसन्न प्रकाशित असेल तर याचा अधिकाधिक प्रभाव मिळतो. मात्र हे प्रत्येक वेळी होईलच असे नाही. अशावेळी आपली उत्तर दिशा बंदिस्त असल्यास अथवा वर म्हणल्याप्रमाणे मोकळी प्रसन्न प्रकाशित नसल्यास उत्तरेकडील भिंतीवर सोबत दिलेले सात घोड्यांचे चित्र लावावे. हे घोडे धावते असुन गतिमानतेचे प्रगतीचे द्योतक आहेत. इथे चंद्राचा प्रकाश असल्याने प्रसन्नता आहे. उत्तर ईशान्य भागात पाण्याचे अस्तित्व आले आहे. त्यामुळे आपोआपच हि दिशाही शुभ झाली आहे. समोर विस्तीर्ण जागा असुन गाव टुमदार घर आहेत. त्यामुळे चित्र रूपात आपली उत्तर दिशा मोकळी होते. तिथुन अपेक्षित ऊर्जा मिळायला मदत होते.


या दोन्ही फोटो फ्रेम चित्र रुपाने आपल्या दक्षिणोत्तर दिशांना शुभ फलदायी करतात. या फोटो फ्रेम आपण घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये लावु शकता. या फोटोफ्रेम आमच्या ज्योतिष कार्यालयामध्ये विक्रीस उपलब्ध केलेल्या आहेत.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/