जन्म कुंडलीमध्ये जर दोन ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये असतील तर त्याला परिवर्तन योग असे म्हणतात. राशीप्रमाणेच हा योग नक्षत्र तसेच नवमांशातुनही तपासला जातो. हा एक राजयोग असुन शुभ स्थानांतुन तसेच शुभ ग्रहांमध्ये झाल्यास उच्च प्रतीचा योग मानला जातो.
रत्नशास्त्रा नुसार षष्ठ स्थानातील अथवा अष्टम स्थानातील अथवा व्यय स्थानातील ग्रहांचे रत्न धारण केले जात नाही.
असा ग्रह जर परिवर्तन योगाने शुभ स्थानामध्ये येत असेल तर स्वराशीचा
म्हणुन त्याचे रत्न धारण करण्यास हरकत नाही. किंबहुना शुभ स्थानामध्ये
येणारा ग्रह राजयोगी होत असल्याने त्याचे रत्न अधिक शुभ फल देईल.
सोबत दिलेल्या जन्म कुंडलीमध्ये गुरु अष्टमामध्ये मकर राशीचा आहे. मकर रास हि गुरु ग्रहाची नीच रास आहे. आधीच अष्टमात आणि त्यातही नीच राशीमध्ये, वरवर पाहता इथे गुरु निर्बली वाटतो. आता मकर राशीचा स्वामी शनि जन्म कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये आहे. म्हणजेच गुरु व शनि एकमेकांच्या राशीमध्ये असुन परिवर्तन योगामध्ये आहेत. या योगाने अष्टमातील गुरु दशमात येतो.
हि एका स्त्री जातकाची जन्म कुंडली असुन तिची गुरुची महादशा चालु आहे. गुरु महादशेमध्ये चंद्र अंतर्दशा चालु असुन पुढील काळात मंगळ तसेच राहुची अंतर्दशा असणार आहे. जातकाचे शिक्षण चालु असुन या महादशेमध्येच करिअरची सुरुवात होणार आहे. या अर्थाने जातकाला गुरुचे रत्न पुष्कराज धारण करावयास सांगितले.
गुरु अष्टमात असल्याने वरवर पाहता त्याचे रत्न धारण करु नये असेच वाटेल. सुक्ष्म अभ्यास करता हाच ग्रह तिचे करिअर मार्गी लावेल.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

No comments:
Post a Comment