Saturday, 24 June 2017

वार्षिक कुंडली


जन्म रवि ज्या महिन्यात ज्या दिवशी व ज्या वेळी अंश कलात्मक विकलात्मक जन्म कुंडलीतील मूळ ठिकाणी येईल त्या वेळची अंशात्मक कुंडली तयार करावी व त्या दिवसाचे, त्या वेळेचे ग्रह स्पष्ट करुन त्या कुंडलीत मांडावे.
व त्याचे योग पहावेत. वार्षिक कुंडलीमध्ये तयार केलेली कुंडली त्या वेळेपासुन पुन्हा रवि जेव्हा मूळ ठिकाणी येईल त्या दिवसापर्यंत त्या कुंडलीचा प्रभाव असतो. या कुंडलीच्या माध्यमातुन जातकाचे वर्ष कसे जाईल हे सांगता येते.
वार्षिक कुंडलीचा उपयोग आपल्याला व्यावसायिक पातळीवर आपल्या व्यवसायाचे नियोजन, नवी सुरवात, आर्थिक गुंतवणुक यासाठी होते. नोकरदार व्यक्तींना नोकरीतील बदल, सद्य नोकरीतील नव्या संधी हे निर्णय घेण्यासाठी होते. कौटुंबिक जीवनात विवाहासारखे निर्णय, संतती सारखे निर्णय या टप्प्यांवर हि कुंडली खुप महत्वाची ठरते. राजकीय जीवनात देखील महत्वाची धोरणे ठरवताना या कुंडलीचा उपयोग होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात महत्वाची खरेदी विक्री, अल्प मुदतीची कर्जे यासाठी या कुंडलीचा आधार घेणे उपयुक्त ठरते.
वर्ष कुंडलीतील चंद्र रविचे शुभ योग पुढील वर्ष यशदायी आनंददायी जाणार असल्याचे द्योतक असतात. गुरु शुक्र ग्रह धनस्थान, दशमस्थान अथवा लाभस्थानाचे भावेश असता तसेच त्यांचे रवि चंद्राशी शुभ योग असताही वर्ष शुभदायी जाते. जन्म कुंडलीतील लग्नेश वर्ष कुंडलीत सप्तमात येता विवाहयोग देतो.
चंद्र बुध अथवा हर्षल बरोबर धनात अथवा व्ययात असता त्यातही तिथे दशमेश असता, नोकरी अथवा व्यवसायामध्ये बदल दर्शवतो. हाच चंद्र बुध किंवा चंद्र हर्षल योग लग्न स्थानातुन असता प्रवासाचे योग दर्शवतो. वार्षिक कुंडलीतील चंद्र अथवा व्ययेश भाग्यात येता दुरचे प्रवास अथवा परदेशगमनाचे योग दर्शवतो.
वर्ष कुंडलीच्या लग्न स्थानातील पापग्रह अशुभ फल देतात. हे पापग्रह षष्ठ स्थानात असताना त्यांचा लग्न अथवा लग्नेशाशी अशुभ योग असता आरोग्याची तक्रारी उद्भवतील. आर्थिक टंचाई देखील या वर्षात जाणवेल.
रवि चंद्राचा ज्या भावेशाशी शुभ योग होईल तो भावेश त्याच्या कार्यक्षेत्रात शुभ फल देईल तर ज्या भावेशाशी अशुभ योग होईल तो भावेश त्याच्या कार्यक्षेत्रात अशुभ फल देईल. स्पष्ट जन्म चंद्र व स्पष्ट वर्ष चंद्र यांच्या फरकातुन या वर्षातील ग्रहांच्या दशा काढता येतात. व त्याच्या माध्यमातुन वर्ष विविध टप्प्यात कसे जाईल हे हि ठरवता येते.
आम्ही जातकाची जन्म कुंडली तसेच वर्ष कुंडली तपासुन आगामी वर्ष जातकास कसे जाईल हे सांगत असतो. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपण ८९७५३१२०५९ / info.bhagyank@gmail.com यावर संपर्क करु शकता.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

शनिचा वृश्चिकेतील प्रवेश

२१ जुन २०१७ ला पहाटे ०४ वाजुन ४२ मिनिटांनी शनि वक्री मार्गाने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला.
तो वृश्चिकेत २४ ऑगस्ट पर्यंत वक्री असेल व ज्येष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणापर्यंत तो मागे येईल तर २५ ऑगस्टला तो मार्गी होईल. २६ ऑक्टोबरला दुपारी ०३ वाजुन २८ मिनिटांनी तो पुन्हा धनु राशीमध्ये प्रवेश करेल.
शनि वृश्चिक राशीमध्ये असताना तुळ राशीला पुन्हा एकदा साडेसाती सुरु होईल तर मेष व सिंह राशीला पुन्हा एकदा पनौती सुरु होईल. हा काळ मकर राशीला मात्र काहीकाळ दिलासा देणारा ठरेल.
शनीला तृतीय, सप्तम व दशम या तीन दृष्टी असतात. तो वृश्चिकेत वक्री असताना त्याची दृष्टी कन्या, वृषभ व कुंभ या राशींवर राहील तर मार्गी झाल्यानंतर त्याची दृष्टी मकर, वृषभ व सिंह या राशींवर राहील.
शनिच्या या गोचर भ्रमणाचा परिणाम वर उल्लेखलेल्या राशींना जाणवेल. यामध्ये चंद्र रास, सूर्य रास तसेच लग्न राशींचा समावेश होतो. तसेच ज्यांच्या जन्म कुंडलीमध्ये शनिची महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालु आहे त्यांनाही याचे परिणाम जाणवतील.
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला पापग्रह मानले असले तरी या गोचर भ्रमणाचा शुभाशुभ परिणाम वर उल्लेखलेल्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडलीमधील शनिच्या शुभाशुभ स्थिती नुसारच होईल. शनि हा न्याय व कायद्याचा कारक असल्याने या काळात वरील राशींनी कायद्याला धरुन व न्याय्य असे वर्तन ठेवल्यास निश्चितच शनि देवांची त्यांच्यावर कृपा राहील. शनि हा समाजाचा द्योतक असल्याने या काळात यथा शक्ती यथा योग्य अशा सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभागी व्हावे. याचाही निश्चितच आपल्याला लाभ होईल. शनिचे रत्न नीलम, अथवा उपरत्न Amethyst किंवा Lapis Lazuli हे आपण या काळात धारण करु शकता. (तज्ञांच्या सल्ल्याशिवाय रत्न धारण करु नये.) अथवा शनिचे यंत्र जवळ बाळगु शकता.
अधिक माहितीसाठी वैयक्तिक संपर्क साधावा. 

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

मंगळाचे गोचर भ्रमण

सध्या मंगळ मिथुन म्हणजेच बुधाच्या राशीमध्ये आहे. बुध हा मंगळाचा शत्रु ग्रह असुन त्या अर्थाने हि मंगळाची शत्रु रास आहे. तो ११ जुलै पर्यंत या राशीमध्ये राहील. त्यानंतर तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. हि चंद्राची रास असुन जलतत्वाची रास आहे. हि मंगळाची नीच रास आहे. तो या राशीमध्ये २७ ऑगस्ट पर्यंत असणार आहे.
हा काळ मेष व वृश्चिक राशीसाठी खडतर असणार आहे. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाची महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालु आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावयाचा काळ आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष लग्न अथवा वृश्चिक लग्न किंवा मेष रवि अथवा वृश्चिक रवि आहे त्यांनाही याचा त्रास काळ जाणवेल.
मंगळ मिथुन राशीमध्ये असे पर्यंत मिथुन राशीला तर कर्क राशीमध्ये असे पर्यंत कर्क राशीलाही याचा त्रास जाणवेल.
तो मिथुनेत असताना त्याची चौथी दृष्टी कन्या राशीवर, सप्तम दृष्टी धनु राशीवर तर अष्टम दृष्टी मकर राशीवर असणार आहे. या राशींनाही याचे परिणाम जाणवतील. तर कर्केत असताना त्याची चौथी दृष्टी तुळ राशीवर, सप्तम दृष्टी मकर राशीवर तर अष्टम दृष्टी कुंभ राशीवर असेल.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/