सहज
सोपे वास्तुशास्त्र
आजकाल
वास्तुशास्त्र म्हणले कि अनेकांच्या मनात
धडकी भरते. येणारा वास्तुतज्ञ काय दोष सांगेल, ते दोष निवारणासाठी
काय उपाय सांगेल आणि ते उपाय करायला
किती खर्च होईल या प्रश्नांची चिंता
जातकाला असते. परंतु रंगीबेरंगी
महाखर्चिक उपायांच्या पलीकडेही एक वास्तुशास्त्र आहे,
जे तुमच्या वास्तूच्या मूळ रचनेला धक्का न लावताही वास्तुदोष
दूर करायचा प्रयत्न करते.
काल
अश्याच एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जातक हॉटेल व्यावसायिक असून त्याने एका प्रसिद्ध मंदिराच्या जवळ एक मोठे हॉटेल
पहिले होते. ते हॉटेल त्याने
भागीदारीमध्ये भाड्याने चालवण्यास घेण्याचा विचार केला होता.. मात्र त्याचा सर्वस्वी निर्णय माझ्या वास्तुभेटीवर अवलंबून होता. नेहमी प्रमाणे जातक अर्ध्या वाटेमध्ये घ्यायला आला. तिथून पुढचा प्रवास त्यांच्या गाडीनेच करायचा होता. प्रवासामध्ये प्राथमिक चर्चा करत असताना जातकाच्या बोलण्यामध्ये एक तणाव जाणवला.
अधिक चर्चे नंतर कळले कि त्यांना काळजी
होती कि काय वास्तुदोष
असतील व त्यासाठी काय
उपाय करावे लागतील.
आम्ही
प्रत्यक्ष वास्तूमध्ये पोहचलो आणि मी एकदम आनंदाने
म्हणले कि गोमुखी वास्तू
आहे. जातकाच्या मनावरील तणाव निवळायला याची मदतही झाली. वास्तू पूर्व पश्चिम पसरलेली होती. पश्चिमेकडून प्रवेशद्वार होते. वास्तूचे अधिकतर बांधकाम पूर्व भागात झालेले होते. तरीही काहीप्रमाणात पूर्व भाग मोकळा सोडला होता. पश्चिम भाग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मोकळा होता. आम्ही वास्तू भोवती एक फेरफटका मारला.
वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कमी अधिक महत्वाच्या मुद्द्यांपैकी जमिनी खालील पाण्याची टाकी सेप्टिक टॅंक या मुद्द्यांवर आधी
चर्चा केली. हे दोन्ही योग्य
दिशेला आले होते. त्या नंतर आम्ही वास्तूमध्ये प्रवेश केला.
हॉटेलच्या
दिशांचा विचार करता नैऋत्य भागामध्ये जिना तर वायव्य भागामध्ये
स्वागतकक्ष तसेच रोखपालाची जागा केली होती. त्यानंतर सर्व खोल्यांची रचना होती. जातकाने खोल्या दाखविण्या
आधीच जातकाला सांगितले कि हॉटेल मालकाने
खोल्यांच्या अंतर्गत रचनेचा फारसा विचार करायचा नसतो. कारण हॉटेल धार्मिक स्थळी आहे. इथे भक्त लोक एकटे अथवा सहकुटुंबीय येणार. मग ते राहून
राहून किती दिवस राहणार. त्यामुळे खोल्यांची अंतर्गत रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा कमीत कमी जागेत अधिकाधिक खोल्यांचा फॉर्म्युलाच योग्य. इथे फक्त अडचण इतकीच आली होती कि उत्तर भागातील
खोल्यांचे शौचालय देखील उत्तर भागात येत होते.
सर्व
वास्तूचे सर्वेक्षण झाल्यावर आम्ही काही दोष आहेत का? काही बदलांची गरज आहे का? काही उपाय करावे लागतील का? या विषयीची चर्चा
सुरु झाली. वास्तूमध्ये एक दोष थेट
दिसत होता तो म्हणजे अधिक
तर बांधकाम पूर्व भागामध्ये असणे तर पश्चिम भाग
मोकळा असणे. यासाठीचा उपाय खूपच सोपा होता. वास्तू हॉटेलची होती तेव्हा सुशोभीकरण आलेच. हे सुशोभीकरण करताना
जातकाला पश्चिम दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे लावण्यास सांगितली. यामुळे आपोआपच पश्चिमेकडील वजन वाढले. तीच झाडे पश्चिम वायव्य भागातही लावण्यास सांगितली. वास्तू दोन मजली आहे. तर नारळाची झाडे
व्यवस्थित वाढली तर त्यांची उंची
तिसऱ्या मजल्या पर्यंत जाते. यामुळे आपोआपच पश्चिमेची उंचीही वाढेल.
उत्तरेकडे
येणाऱ्या शौचालयांचा मुद्दा मनात गाठ मारुन होता. त्यासाठी उत्तरेकडून पूर्वे पर्यंत सर्वत्र फूल झाडे लावण्यास सांगितले. यामुळे या दिशेचे दोष
कमी व्हायला त्वरित मदत होईल. पश्चिमेकडे झाडे तर लावायला सांगितली,
पण तिथेच प्रवेशद्वार येत होते. हे प्रवेश द्वार
पश्चिम नैऋत्य भागात होते, जिथे ते शुभ मानले
जात नाही. अशावेळी प्रवेशद्वार पश्चिमेकडील तिसऱ्या चौथ्या भागात हलविण्यास सांगितले. यामुळे प्रवेशद्वाराचा दोष तर दूर झालाच
पण त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यास मुबलक जागाही झाली. एवढ्या मोठ्या हॉटेलला जनरेटरची गरज तर लागणारच होती.
मी जनरेटरला आग्नेय भागात करायला लावलेच पण मेन स्वीचही
तिथेच हालवायला लावला.
हॉटेलच्या अंतर्गत रचनेमध्ये फारसे बदल करण्याची गरज नसली तरी स्वागत कक्ष व रोखपालाची जागा पश्चिम वायव्य भागात येत होती. इथे खर्चांमध्ये वाढ तर होतेच पण कर्मचारीही टिकत नाहीत. जातक एकाच वेळी अनेक हॉटेल्स चालवत असल्याने त्याची भिस्त अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर असणार होती. त्यामुळे एरवी दुर्लक्षित असणारा हा कक्ष या वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. खरे तर हा कक्ष दक्षिण नैऋत्य भागात उत्तरेकडे तोंड करुन असायला हवा होता, अथवा पश्चिम नैऋत्य भागात पूर्वेकडे तोंड करुन असायला हवा होता. मात्र या भागात जिना आधीच बांधला असल्याने तसे करणे शक्य नव्हते. अशावेळी जातकाला कक्ष आणखी दक्षिणेकडे सरकवत अगदी प्रवेशद्वारापर्यंतची जागा वापरली. यामुळे आपोआप तो किमान पश्चिम भागात येऊन त्याचा दोष निश्चितच दूर झाला. सोबत दिलेल्या चित्रांचा आकार छोटा असल्याने हा बदल चित्रामध्ये मात्र स्पष्ट कळून येणार नाही.
आपण
विचाराल या वास्तूमध्ये खरंच
दोष होते का? तर निश्चितच होते.
पण त्या दोषांवरच्या उपायांना नियमित सुशोभीकरणाचा भाग बनवून त्या दोषांनाच वास्तूची मुख्य ताकद बनविण्यात यश आले. वास्तुशास्त्र
म्हणजे मोठमोठे पिरॅमिड नव्हे, मोठमोठी यंत्रे नव्हे कि मोठमोठ्या पूजा
अथवा ग्रहशांती नव्हे. हि वास्तू एक
छोटेसे उदाहरण आहे कि सहज सोप्या
व कळूनही न येणाऱ्या उपायांमधून
सुद्धा वास्तुदोष दूर करता येतात व त्या वास्तूमधून
अधिकाधिक लाभ व आनंद मिळवता
येऊ शकतो.
- होरापंडीत
मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र
। वास्तुशास्त्र । रमलशास्त्र ।
होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला
केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१
८९७५ ३१२ ०५९ । +९१ २०
२७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com |
https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/