सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहण
नुकतेच १ जूनला सूर्य ग्रहण झाले तर १५ जून ला चंद्र ग्रहण होणार आहे. या ग्रहणांना खागोलाशास्त्रानी जसे सिद्ध करता येईल तसेच ते ज्योतिषीय पद्धतीनेही सिद्ध करता येते किंवा त्याचे आधीच भाकीत करता येते. म्हणूनच की काय दाते पंचांगकर्ते वर्षाच्या सुरवातीलाच या ग्रहणांविषयी भाकीत करू शकतात.
I always say, Astronomy and Astrology always go with each other.
मग ते कसे? या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.
(टीप: सर्वांनाच पंचांगाचे ज्ञान नसल्यामुळे खाली सांगितलेला गणिती भाग सर्वांच्याच लक्षात येईलच असे नाही. पण इच्छुकांनी किंवा अभ्यासूंनी गणित करून बघण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही.)
राहू व केतू:
ग्रहणाला ज्योतिषीय पद्धतीनी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम राहू केतूचा अभ्यास करणे किंवा जाणून घेणे महत्वाचे आहे.
राहू व केतू हे दृश्य ग्रह नसून ते छेदन बिंदू आहेत. चंद्राचा मार्ग क्रांती वृत्ताला ५ अंश तिरकस दक्षिणोत्तर असतो. चंद्र कक्षा क्रांती वृत्ताला छेदून उत्तरेकडे जाते तो बिंदू म्हणजे राहू. व दक्षिणेकडे जाते तो बिंदू म्हणजे केतू.
मग ज्या अमावास्या पौर्णिमेला चंद्राचे स्पष्ट स्थान तत्कालीन स्पष्ट राहू किंवा स्पष्ट केतू इतके असते. तेंव्हा ग्रहणं होते.
सूर्य ग्रहण
आता आपण हे जाणून घेऊ की सूर्य ग्रहण कधी व कसे होते.

आपणा सर्वांना हे माहीतच आहे कि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. असा हा चंद्र स्वतःच्या कक्षेतून फिरत असताना सूर्याचा संपूर्ण किंवा काही भाग आपल्या पृथ्वीवरून दिसेनासा होतो याला सूर्य ग्रहणं म्हणतात. ही स्थिती फक्त अमावास्येलाच होते. कारण अमावास्येला चंद्र व सूर्य एकाच राशीत असतात.
अमावस्याकाळी राहू किंवा केतू यांच्या पासून सूर्य १९ अंश किंवा त्याच्या पेक्षा दूर असेल. तर सूर्य ग्रहण होणार नाही.
तोच सूर्य जर १३ अंश ते १९ अंश दूर असेल खंडग्रास ग्रहण होते.
व तेच अंतर जर का १३ अंशापेक्षा कमी असेल तर खग्रास ग्रहण होते.
पण मग हे ग्रहण भारतातून का नाही दिसले?
कारण ज्या वेळी हे अंतर आपण भारत खंडावरून मोजतो तेंव्हा ते १९ अंशांच्याही पुढे जाते.
चंद्र ग्रहण
पृथ्वीपासून विरुद्ध बाजूस चंद्र येतो म्हणजेच चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते, तेंव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा काहीसा भाग तर कधी संपूर्ण चंद्रच दिसेनासा होतो. ही स्थिती तेंव्हाच येऊ शकते जेंव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यात जेंव्हा सहा राशींचे अंतर असेल. आणि असे पौर्णिमेलाच होऊ शकते कारण पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य यांच्यात सहा राशींचे अंतर असते म्हणजेच ते बरोबर एकमेकांच्या समोर येतात.
पौर्णिमेला राहू किंवा केतू यांच्यापासून चंद्र १३ अंशापेक्षा दूर असेल तर चंद्र ग्रहण होणार नाही.
हे अंतर जर ९ अंश ते १३ अंशांपर्यंत असेल तर खंडग्रास चंद्रग्रहण होते.
व जर हे अंतर ९ अंशांपेक्षाही कमी असेल तेंव्हा खग्रास चंद्र ग्रहण होते.
१५ जून २०११ रोजी होणारे चंद्र ग्रहण हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
याचा गणिती भाग खाली दाखवत आहे.
खग्रास चंद्र ग्रहणाच्या वेळा
स्पर्श: रात्री ११:५३
संमिलन: रात्री १२:५२
ग्रहणमध्य: उत्तरारात्री १:४३
उन्मीलन: उत्तरारात्री २:३३
मोक्ष; उत्तरारात्री ३:३३
रात्री ११:५३ ला ग्रहांची स्थिती:
चंद्र वृश्चिक राशीमध्ये २८ अंश ४० कलांवर असेल.
तर राहु वृश्चिक राशीमध्येच २९ अंश २४ कलांवर असेल. म्हणजेच इथे दोघांमधील अंतर एक अंशापेक्षाही कमी झालेले असेल. म्हणुन त्याला स्पर्श असे नाव दिले आहे.
रात्री १२:५२ ला ग्रहांची स्थिती:
चंद्र वृश्चिक राशीमध्ये २९ अंश १४ कलांवर असेल.
तर राहु वृश्चिक राशीमध्येच २९ अंश २४ कलांवर असेल. म्हणजेच इथे दोघांमधील अंतर संपते म्हणुन त्याला संमीलन असे नाव दिले आहे.
रात्री १:४३ ला ग्रहांची स्थिती:
चंद्र वृश्चिक राशीमध्ये २९ अंश ५५ कलांवर असेल.
तर राहु वृश्चिक राशीमध्येच २९ अंश २४ कलांवर असेल. म्हणजेच इथे चंद्र राहुच्या पुढे जायला सुरवात करतोय. म्हणुन त्याला ग्रहणमध असे नाव दिले आहे.
रात्री २:३३ ला ग्रहांची स्थिती:
चंद्र धनु राशी मध्ये नुकताच प्रवेश करून २३ कला पुढे गेला असेल.
तर राहु वृश्चिक राशीमध्येच २९ अंश २४ कलांवर असेल. इथे चंद्र राहुच्या पुढे जाऊन त्याने पुढच्या राशीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच आता ग्रहणाचे उन्मीलन होत आहे.
रात्री ३:३३ ला ग्रहांची स्थिती:
आता चंद्र धनु राशीमध्ये ५६ कलांवर असेल.
तर राहू मात्र तिथेच वृश्चिक राशीमध्ये २९ अंश २४ कलांवर असेल. म्हणजेच आता राहू व चंद्र यांच्यातील अंतर एक अंशापेक्षाही वाढलेले असून ग्रहण सुटलेले आहे.
म्हणूनच याला मोक्ष असे संबोधले आहे.
हा सर्व झाला गणिती भाग आणि याच्यातच ज्योतिष आणि ज्योतीषातली भाकिते सामावलेली आहे.
यानंतरही एक महत्वाचा भाग उरतो आणि तो म्हणजे ग्रहणाचे परिणाम का आणि कसे होतात ते. मात्र या विषयावर एका वेगळा सविस्तर लेख मी पुढे मागे लिहीन.
हा महिना कसा जाणार आहे, या संबंधी विवेचन करताना मी वेगवेगळ्या राशींवर होणारे ग्रहणाचे परिणाम नमूद केलेलेच आहेत. तरीपण जाता जाता त्याचा अगदी थोडक्यात उल्लेख करतो.
शुभ फळ: मिथुन, कन्या, मकर, कुंभ
मिश्र फळ: वृषभ, कर्क, तूळ, मीन
अनिष्ट फळ: मेष, सिंह, वृश्चिक, धनु
मी माझ्यापरीनी हा लेख अभ्यासपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी छोट्या चुका समजून घ्याव्यात. तर काही शंका आठवा प्रश्न असतील तर ते Email करून किंवा इथेच Comment करून विचारावेत.

No comments:
Post a Comment