पहिल्या
संततीचा दुसरा किंवा तिसरा वाढदिवस झाला कि घरातल्या वडीलधाऱ्या
माणसांकडुन दुसऱ्या संततीसाठी विचारणा सुरु होते. अगदी पूर्वी सारखी ४-५ नको
पण किमान हम दो हमारे
दो तरी असावे अशी त्यांची धारणा असते. पहिली मुलगी असेल तर मुलासाठी प्रयत्न
करावा का असे काहींना
वाटते तर पहिला मुलगा
असेल तर एक तरी
मुलगी असावी म्हणून पुन्हा चान्स घ्यायचा विचार सुरु होतो. वैद्यक शास्त्राचा विचार करता डॉक्टरकडे जाताच ते विविध ट्रीटमेंट
सुरु करायला लावतात. आयुर्वेदात यासाठी वेगवेगळ्या काळज्या घ्यायला सांगितल्या आहेत. बाजारात मग ऊर्जा वर्धक
औषध आहेत त्याचा वापर काही जण करायला लागतात.
इति पासुन अति पर्यंत अनेक गोष्टींची मालिका सुरु होते.
यात
एक बाजु आपल्या कुंडलीचीही असु शकते असा विचार फार थोडे लोक करतात. जे करतात ते
मात्र निर्णय घ्यायच्या आधी एकदा भेटुन जातात, विचारुन जातात. काय असते कुंडलीमध्ये दुसऱ्या संतती विषयी? मुळात संतती पहिली असो कि दुसरी, तो
चान्स घेण्यापूर्वी एकदा ग्रहस्थिती जरुर तपासावी. यामध्ये स्त्रीच्या कुंडलीचे महत्व जास्त असले तरी पुरुषाच्या कुंडलीलाही महत्व आहे. मग हा निर्णय
निभावुन नेण्याची आपली मानसिक, शारीरिक व आर्थिक तयारी
आहे का? हे कुंडलीवरुन तपासता
येते. या निर्णयातून आईला
काही धोका नाही ना हे पाहावे
लागते. ज्या काळात हा निर्णय घ्यायचा
आहे, त्या काळातली विशोंत्तरी महादशा, अंतर्दशा कुठली आहे तपासावे लागते. गोचर ग्रहांची स्थिती कशी असणार आहे. याचा आढावा घ्यावा लागतो. स्त्री पुरुषांनी एकत्र येण्यापासुन ते गर्भ धारणे
पर्यंत तसेच गर्भ धारणे पासुन ते बाळंतीण होई
पर्यंत कुठला काळ प्रतिकूल आहे व कुठला काळ
अनुकूल आहे हे समजुन घ्यावे
लागते. संतती झाल्यापासुन साधारण पहिली वर्ष दोन वर्ष कशी असतील याचा अंदाज घ्यावा लागतो.
हा
एवढा सगळा अभ्यास अथवा विचार प्रथम संततीच्या वेळी एक वेळ नाही
केला तरी हरकत नाही, मात्र दुसऱ्या संततीच्या वेळी मात्र या सगळ्याचा अभ्यास
करुन हा निर्णय कधी
घ्यावा किंवा घ्यावा कि नाही घ्यावा
या विषयीचे मार्गदर्शन तज्ञांकडून घेणे गरजेचे असते. यामध्ये पहिल्या संततीच्या वेळी शस्त्रक्रिया झाली असेल तर दुसऱ्या वेळी
पण होईल का? हा निर्णय घेण्यासाठी
स्त्रीची मानसिक ताकद आहे? ज्या गर्भाशयात हि गर्भ धारणा
व्हायची ते याला साथ
देईल का? होणारी संतती सुदृढ होईल का? या निर्णय नंतर
स्त्रीची तब्येत पुन्हा सुधारेल कि कायमचा दवाखाना
मागे लागेल? दोन्ही संततींसाठी पालकत्वाची जबाबदारी उत्तम पार पाडली जाईल ना? वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलवतील का? या व यासारख्या
अनेक प्रश्नांची उत्तरे पती पत्नींच्या कुंडलीवरुन तपासणे गरजेचे असते.
दोघांच्या
जन्म कुंडलीतील लग्न लग्नेश कसे आहेत? पंचम पंचमेश कसे आहेत? पंचमस्थित ग्रह कसे आहेत? पंचमाला पाहणारे ग्रह कसे आहेत? पंचमाचे पंचम म्हणुन भाग्यस्थान, भाग्येश व भाग्यस्थित ग्रह
कसे आहेत? चंद्राचे पंचम स्थान कसे आहे? यांचा अभ्यास केला गेला पाहिजे संतती योगाचा अभ्यास हा सप्तम अथवा
अष्टम स्थानाच्या अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही. सप्तमस्थान हे कामसुखाचे स्थान
आहे तसेच ते गर्भाशयाचे स्थान
आहे. तसेच द्वितीय संततीचा विचार हा सप्तम स्थानावरुन
अधिक होतो. त्या खालोखाल अष्टम स्थानाला अनन्य साधारण महत्व आहे. स्त्रीच्या कुंडलीमध्ये हे योनीचे स्थान
असल्याने अष्टम अष्टमेश तपासल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. या योगाचा अभ्यास
करताना लाभ स्थानाचा विचार करणेही महत्वाचे ठरते. सप्तमस्थान हे जोडीदाराचे स्थान
आहे तर लाभ स्थान
हे सप्तमाचे पंचम स्थान आहे. पंचमाचे षष्ठ म्हणुन दशमस्थान, पंचमचे अष्टम म्हणुन व्यय स्थान तर पंचमचे व्यय
म्हणुन चतुर्थ स्थानाचा अभ्यास करावा लागतो. द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान
असल्याने हि वंशवेल आहे,
तिची वाढ या स्थानावर अवलंबुन
आहे. या सर्व स्थानांचा
अभ्यास करत असताना संततीकारक गुरु, आत्माकारक रवि व संवेदनांचा कारक
चंद्र यांचीही कुंडलीतील स्थिती तपासणे गरजेचे.
हे
सर्व आपण प्रथम संततीच्या वेळी पाहावे का? हो जरुर पाहावे.
पण आपण म्हणतो ना काही गोष्टी
सहज घडल्या कि आनंद जास्त
असतो. त्यामुळे माझे मत आहे कि
प्रथम संततीच्या वेळी एवढा विचार केला नाही तरी हरकत नाही, मात्र दुसऱ्या संततीच्या वेळी मात्र एकदा तज्ञ ज्योतिषांचा सल्ला जरुर घ्यावा.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/